---Advertisement---

‘सूर्यकुमारचा हनिमून पिरियड आता संपलाय’, सतत फ्लॉप ठरत असल्याने चाहत्यांकडून होतोय ट्रोल

On: मंगळवार, सप्टेंबर 28, 2021 4:25 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेच्या ३९ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि मुंबई इंडियन्स हे दोन्ही संघ आमने-सामने होते. हा सामना मुंबई इंडियन्स संघासाठी अतिशय महत्वाचा होता. कारण गेल्या दोन सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. परंतु, सलग तिसऱ्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने मुंबई इंडियन्स संघाला पराभूत केले. या सामन्यात मुंबई इंडियन्स संघातील फलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरले होते. तसेच टी -२० विश्वचषक स्पर्धेसाठी निवड झालेला खेळाडू सूर्यकुमार यादव देखील साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरला आहे. ज्यामुळे नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

आयपीएल २०२१ स्पर्धा झाल्यानंतर यूएई आणि ओमानमध्ये १९ ऑक्टोबर पासून टी -२० विश्वचषक स्पर्धेचा थरार पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेसाठी बीसीसीआयने १५ सदस्यीय खेळाडूंची घोषणा केली आहे. या संघात मुंबई इंडियन्स संघातील हार्दिक पंड्या, रोहित शर्मा,इशान किशन, राहुल चाहर, जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव या खेळाडूंचा सहभाग आहे. रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि राहुल चाहरला वगळले, तर इतर ३ खेळाडू साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरले आहेत.

मुंबई इंडियन्स संघाचा अनुभवी फलंदाज सूर्यकुमार यादव याने इंग्लंड आणि श्रीलंका संघाविरुद्ध झालेल्या वनडे आणि टी -२० मालिकेत अप्रतिम फलंदाजी केली होती. या खेळीच्या जोरावर त्याची आगामी टी -२० विश्वचषक स्पर्धेसाठी निवड करण्यात आली होती. परंतु, आयपीएल २०२१ स्पर्धेतील दुसऱ्या टप्प्यात त्याला अवघ्या १६ धावा करण्यात यश आले आहे. त्यामुळे चाहत्यांनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

एका युजरने लिहिले की, “मला वाटते की, सूर्यकुमार यादव मन लावून खेळला नाही. त्याच्या या वृत्तीची त्याला आणि त्याच्या संघाला चांगलीच किंमत मोजावी लागली आहे. अशा प्रकारच्या गोष्टी स्वीकार करण्यासारख्या नाहीत आणि मला टी-२० विश्वचषक स्पर्धेबद्दल खरोखर काळजी वाटते.”

तर दुसऱ्या एका युजरने लिहिले की,” सूर्यकुमार यादव पुन्हा एकदा अपयशी ठरला आहे. तर श्रेयस अय्यरने लक्षवेधी कामगिरी केली आहे. कृपया करून निवडकर्त्यांनी याची दखल घ्यावी आणि श्रेयस अय्यरला संघात संधी द्यावी. ” तसेच आणखी एका युजरने ट्विट करत लिहिले की, “असे वाटते की, सूर्यकुमार यादवचा हनिमून पिरियड संपला आहे. आता वास्तव समोर येत आहे. मुंबई इंडियन्सपेक्षा मला टी -२० विश्वचषक स्पर्धेत भारताची जास्त चिंता सतावतेय.”

https://twitter.com/Shreyyyyansh/status/1442180967574097920?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1442180967574097920%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fcricketaddictor.com%2Fcricket%2Ftwitter-reactions%2Fipl-2021-one-season-wonder-honeymoon-period-over-twitterverse-slams-suryakumar-yadav-over-his-flop-show-2%2F

https://twitter.com/VK__Goat18/status/1442177997490909192?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1442177997490909192%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fcricketaddictor.com%2Fcricket%2Ftwitter-reactions%2Fipl-2021-one-season-wonder-honeymoon-period-over-twitterverse-slams-suryakumar-yadav-over-his-flop-show-2%2F

https://twitter.com/Shebas_10/status/1442184281426567168?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1442184281426567168%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fcricketaddictor.com%2Fcricket%2Ftwitter-reactions%2Fipl-2021-one-season-wonder-honeymoon-period-over-twitterverse-slams-suryakumar-yadav-over-his-flop-show-2%2F

https://twitter.com/Farheenfarru14/status/1442178779091140611?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1442178779091140611%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fcricketaddictor.com%2Fcricket%2Ftwitter-reactions%2Fipl-2021-one-season-wonder-honeymoon-period-over-twitterverse-slams-suryakumar-yadav-over-his-flop-show-2%2F

https://twitter.com/AparajitaTiwa11/status/1442178653111009297?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1442178653111009297%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fcricketaddictor.com%2Fcricket%2Ftwitter-reactions%2Fipl-2021-one-season-wonder-honeymoon-period-over-twitterverse-slams-suryakumar-yadav-over-his-flop-show-2%2F

https://twitter.com/CSKian_007/status/1442178581241614346?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1442178581241614346%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fcricketaddictor.com%2Fcricket%2Ftwitter-reactions%2Fipl-2021-one-season-wonder-honeymoon-period-over-twitterverse-slams-suryakumar-yadav-over-his-flop-show-2%2F

https://twitter.com/chetansd21/status/1442178414266314752?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1442178414266314752%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fcricketaddictor.com%2Fcricket%2Ftwitter-reactions%2Fipl-2021-one-season-wonder-honeymoon-period-over-twitterverse-slams-suryakumar-yadav-over-his-flop-show-2%2F

 

या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून प्रथम फलंदाजी करताना ग्लेन मॅक्सवेलने ३७ चेंडूंमध्ये सर्वाधिक ५६ धावांची खेळी केली होती. तर विराट कोहलीने ४२ चेंडूंमध्ये ५१ धावांचे योगदान दिले होते. या खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला २० षटक अखेर ६ बाद १६५ धावा करण्यात यश आले होते.

या धावांचा पाठलाग करताना कर्णधार रोहित शर्माने एकहाती झुंज देत ४३ धावांची खेळी केली होती. तर क्विंटन डी कॉकने २४ धावांचे योगदान दिले होते. परंतु, इतर कुठल्याही फलंदाजाला साजेशी कामगिरी करता आली नाही. परिणामी मुंबई इंडियन्स संघाला हा सामना ५४ धावांनी गमवावा लागला.

महत्त्वाच्या बातम्या – 

Video: केवळ १८ धावांची खेळी केली, पण साहाने त्याच्या ८३ मीटरच्या षटकाराने मिळवली सर्वांची वाहवा

सनरायझर्सच्या विजयाचा नायक ठरलेल्या रॉयची सामनावीर ठरल्यानंतर भावुक प्रतिक्रिया, म्हणाला…

सनरायझर्सने तोडले वॉर्नरसोबतचे नाते! स्वतः दिली माहिती, उर्वरित आयपीएलमध्ये खेळण्याची शक्यता धूसर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---