भारतीय क्रिकेट संघाला आशिया चषक 2022 मधील सुपर फोरच्या सलग दुसऱ्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या सामन्यात श्रीलंकेने भारतीय संघाला एक चेंडू राखून पराभूत केले. या पराभवामुळे भारतीय संघाच्या अंतिम फेरी जाण्याच्या आशा काहीशा अंधुक झाल्या आहेत. त्याचवेळी भारतीय पाठीराख्यांनी सोशल मीडियावर भारतीय संघाला बॉयकॉट करण्याची देखील मागणी सुरू केली.
दुबई येथे झालेल्या या सामन्यात भारताने 173 धावा उभारल्या होत्या. प्रत्त्युत्तरात श्रीलंकेने चार गडी गमावत हे आव्हान पार केले. दोन दिवसापूर्वीच भारताला पाकिस्तानकडूनही पराभव पत्करावा लागला होता. या सलग दोन पराभवामुळे चाहत्यांनी कर्णधार रोहित शर्मा व भारतीय संघाला बॉयकॉट करण्याची मागणी सुरू केली आहे. इतरही काही तीव्र प्रतिसाद सोशल मीडियावर येत आहेत.
Boycotting almost everything is the new trend in india and I’m sure Boycott Indian cricket team/cricket will be trending soon #INDvSL
— Asif wangnoo (@asifwangnoo1) September 6, 2022
https://twitter.com/Ajayajay1010/status/1567213385045114880?t=jZ29fJp7d-ge5y5QgivN1w&s=19
भारतीय संघाच्या पराभवानंतर एका चाहत्याने ट्विट करत लिहिले, ‘आता भारतीय क्रिकेटला बॉयकॉट करण्याची वेळ आली आहे.’ अन्य एका चाहत्याने लिहिले, ‘सध्या भारतात बऱ्याच गोष्टी बॉयकॉट होत आहेत. आता लवकरच क्रिकेटलाही बॉयकॉट केले जाऊ शकते.’
यासोबतच काहींनी भारतीय संघाच्या खराब कामगिरीला आयपीएलला जबाबदार धरले. भारतीय खेळाडूंना आयपीएलमध्ये मुबलक पैसा मिळत असल्याने भारतीय खेळाडू देशासाठी तितके चांगले खेळत नाहीत असा आरोप काहींनी केला. एका चाहत्याने लिहिले,
Time for BCCI to take some strong decisions and give some challenges to Indian team players like if they don't perform in international matches they should be banned to play in IPL also and don't allow them to do endorsements…..
— Naveen Loyal (@NaveenLoyal) September 6, 2022
‘आता बीसीसीआयला आयपीएलबाबत काही मोठे निर्णय घेण्याची वेळ आली आहे. आयपीएलचे करार कितपत असावे यावर नक्कीच नियम असायला हवेत.’ दुसऱ्या एका चाहत्याने थेट आयपीएल बंदच करण्याचा सल्ला दिला आहे. खेळाडू जाहिरातींमध्ये जास्त वेळ दिसतात असे देखील काहींनी म्हटले.