---Advertisement---

स्मिथवर शेन वार्नने साधला निशाणा, पण नेटकऱ्यांनी दिग्गजालाच टाकली गुगली

Shane-Warne
---Advertisement---

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव स्मिथ मागच्या काही काळापासून त्याच्या खराब फॉर्मशी झगडत आहे. त्याला आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यातही धावा करण्यासाठी संघर्ष करताना पाहिले गेले होते. त्यानंतर लगेच सुरु झालेल्या टी-२० विश्वचषकातही त्याचे प्रदर्शन फारसे बरे राहिलेले नाही. त्याने विश्वचषकात आतापर्यंत खेळलेल्या तीन सामन्यात अवघ्या ६३ धावा केल्या आहेत.

शनिवारी (३० ऑक्टोबर) खेळल्या गेलेल्या इंग्लंडिविरुद्धच्या सामन्यातही तो काही खास कामगिरी करू शकला नाही. पण असे असले तरी, या स्पर्धेत आत्तापर्यंत स्मिथची कामगिरी बाकी ऑस्ट्रेलियन फलंदाजांपेक्षा समाधानकारक राहिली आहे. पण, ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकी गोलंदाज शेन वॉर्नने त्याच्यावर निशाणा साधला होता. मात्र, त्यालाच नेटकऱ्यांनी धारेवर धरलं.

स्मिथने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात संघ अडचणीत असताना निराशाजनक खेळी केली. त्याने अवघ्या पाच चेंडूंचा सामना केला आणि फक्त एक धाव करून तो बाद झाला. त्याच्या या खराब खेळीनंतर शेन वॉर्नने त्याच्यावर ट्वीटरच्या माध्यमातून जोरदार टीका केली आहे.

शेन वॉर्नने त्याच्या अधिकृत ट्वीटर खात्यावरून एक पोस्ट शेअर करत त्यामध्ये लिहिले की, “ऑस्ट्रेलियाकडून निराशाजनक निवड, मार्शला बाहेर ठेवले आणि मॅक्सवेलला पॉवर प्लेमध्ये फलंदाजीसाठी वरती पाठवले. (मॅक्सवेलने पॉवर प्लेनंतर फलंदाजीसाठी यायला पाहिजे होते) मॅक्सवेलच्या आधी स्टॉयनिसने फलंदाजीसाठी यायला पाहिजे होते. संघाची खराब रणनीती. मला स्मिथ आवडतो, पण तो टी-२० संघात नसला पाहिजे. स्मिथच्या जागी संघात मार्शला संधी मिळाली पाहिजे.”

शेन वॉर्नने अशा कडक शब्दात संघ व्यवस्थापन आणि स्मिथवर निशाणा साधला, पण नंतर शेनने केलेले हे ट्वीट त्याच्याच आंगलट आल्याचे दिसत आहे. चाहत्यांना शेनचा हा अंदाच आवडलेला दिसत नाही. शेनने केलेल्या ट्वीटनंतर चाहते चांगलेच भडकले आहेत आणि त्याच्या ट्वीटवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. चाहत्यांनी शेनला चांगलेच ट्रोल केले आहे.

https://twitter.com/puntfiend/status/1454454859172749314

https://twitter.com/Ritesh88362763/status/1454548261977554946

दरम्यान, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकली होती आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलिया निर्धारित २० षटकांमध्ये अवघ्या १२५ धावा करून सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात इंग्लंडने हे लक्ष्य अवघ्या ११.४ षटकांमध्ये आणि दोन विकेट्सच्या नुकसानावर गाठले आणि सामना जिंकला.

इंग्लंडसाठी जॉस बटलरने ३२ चेंडूत सर्वाधित ७१ धावांची नाबाद खेळी केली. तसेच क्रिस जॉर्डनने चार षटकांमध्ये केवळ १७ धावा देऊन ऑस्ट्रेलियाच्या तीन विकेट्स घेतल्या.

महत्त्वाच्या बातम्या – 

ट्विटरवर सुरू झाला बॅन आयपीएल ट्रेंड; चाहत्यांच्या आल्या संतप्त प्रतिक्रिया

न्यूझीलंडने दुसऱ्यांदा केली टीम इंडियाची नाचक्की; टी२० विश्वचषकातील…

दुष्काळात तेरावा महिना! बांगलादेशला मोठा धक्का, टी२० विश्वचषकातून शाकिब अल हसन बाहेर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---