भारतीय क्रिकेट संघ जून महिन्यापासून इंग्लंड दौऱ्यावर असून ४ ऑगस्टपासून त्यांना इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. तत्पुर्वी, इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्स या पूर्ण कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. स्टोक्सने स्वत: या मालिकेतून माघार घेण्यासाठी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाला (ईसीबी) विनंती केली होती. जी ईसीबीने मान्य केली. मात्र, या निर्णयानंतर चाहत्यांनी त्याच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे.
या कारणाने मागितली विश्रांती
आयपीएल २०२१ दरम्यान झालेल्या आपल्या डाव्या हाताच्या बोटाला झालेल्या दुखापतीतून पूर्णपणे बरे होण्यासाठी आणि स्वत:च्या मानसिक आरोग्यावर लक्ष देण्यासाठी त्याने तात्काळ प्रभावाने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून अनिश्चित काळासाठी ब्रेक घेतला आहे. त्याने पाकिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी संघात कर्णधार म्हणून पुनरागमन कलेले. ही मालिका इंग्लंडने ३-० अशा फरकाने जिंकली होती. स्टोक्स बाहेर गेल्याने त्याच्याजागी क्रेग ओव्हरटन याला इंग्लंडच्या कसोटी संघात सहभागी करण्यात आले आहे.
चाहत्यांनी केले ट्रोल
भारताविरुद्धच्या मालिकेतून माघार घेतल्याने सोशल मीडियावर काही चाहत्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली. एका चाहत्याने लिहिले, ‘बेन स्टोक्स भारतीय संघाचा सामना करण्यास घाबरतो का? तो का पळतोय?’
Ben Stokes afraid of facing Indians? Running away?? 😀😀 #ENGvIND #INDvENG
— Rajendra Marathe (@marathe) July 30, 2021
चाहते त्याला ट्रोल करत असले तरी काहींनी त्याच्या या निर्णयाचे स्वागत केले असून, त्याने लवकरात लवकर मैदानात पुनरागमन करावे अशी इच्छा व्यक्त केली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या भारत दौऱ्यावर बेन स्टोक्स सपशेल अपयशी ठरला होता. भारताचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने त्याला चांगलेच त्रस्त केलेले.
No Stokes, Archer, Woakes and wood. So India will face England C, Now India should win this quite comprehensively, No excuses this time plz.
— Aakash Sinha (@IamSinha18) July 30, 2021
Only English players do this. It was started from Marcus Trescothic. After that we saw many players doing the same. "Daal me kuch kaala hai"
— Tauseef Anjum Lodhi (@Tauseef_Anjum) July 30, 2021
He dosen't want to be a part of the England team that beats India because he wants to save his IPL contract. Players from Australia, South Africa and England have been doing it but will do that more now, lose to India that is.
— Asif H William (@AsifHaroonWilli) July 30, 2021
Even if he isn't on the pitch, Viraat will always remember #BenStokes pic.twitter.com/jm5JBorqJm
— Srikanth (@copykanth) July 31, 2021
https://twitter.com/ebzhaque/status/1421154845071917058
Best wishes to Ben Stokes a brave decision. What ever happens from here thank you for all those fantastic moments you gave us in Cricket.👍
— wardietony💙🎼🛠️👷🌹✊ (@wardietony) July 31, 2021
https://twitter.com/mykeysports/status/1421160911545544711
Others : Break up hurts the most..
Me: U don’t know these feelings that Ben Stokes took indefinite break from all cricket…💔😒#BenStokes @englandcricket pic.twitter.com/jrK5jQzfEK— Abrar 🇵🇰🇦🇪 (@tweets_abrar) July 30, 2021
ईसीबीने दिला पाठींबा
ईसीबीने यासंदर्भात माहिती दिली आहे की, “स्टोक्सने भारताविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेतून माघार घेतली आहे. तो अजूनही डाव्या हाताच्या बोटाला झालेल्या दुखापतीतून पूर्णपणे बरा झालेला नाही. या दुखापतीतून सावरण्यासाठी आणि स्वतःला मानसिकदृष्या पूर्णपणे निरोगी बनवण्यासाठी त्याने हा निर्णय घेतला आहे. ईसीबी त्याच्या या निर्णयाचे पूर्णपणे समर्थन करते आहे. तो क्रिकेटपासून दूर असतानाच्या अवधीदरम्यान आम्ही त्याला शक्य तितकी मदत करण्याचा प्रयत्न करू.”
सध्या जगातील सर्वोत्तम अष्टपैलू असलेला स्टोक्स आपल्या संपूर्ण कारकीर्दीत दुखापतीमुळे त्रस्त राहिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘आमच्याकडे आमचा बादशहा आहे’, रिषभ पंतचा फोटो शेअर करत ‘या’ खेळाडूने दिलेले कॅप्शन चर्चेत
विराट विरुद्ध अँडरसन संघर्षात कोण मारणार बाजी? दिग्गज फिरकीपटूने घेतले ‘हे’ नाव
श्रीलंकेत दमदार कामगिरी करत ‘या’ युवा भारतीय खेळाडूंनी ठोकली टी२० विश्वचषकासाठी दावेदारी