सोमवार (१५ ऑगस्ट)भारताने स्वातंत्र्याची ७५ वर्षे (India’s 75th anniversary of its independence) पूर्ण केली आहेत. यानिमित्त भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक घरावर तिरंगा ही मोहीम राबवली. या मोहीमेत मोठ्या प्रमाणात लोकांनी सहभाग नोंदवला. तर अनेकांनी त्यांच्या सोशल मीडियाच्या अकाउंडवरून स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. यामध्ये भारताच्या दोन्ही क्रिकेट संघातील खेळाडूंनी चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यातील भारताच्या पुरूष संघाचा कर्णधार रोहित शर्माचे ट्वीट भलतेच व्हायरल होत आहे. त्यामागचे कारणही तेवढेच मोठे आहे.
रोहित शर्मा (Rohit Sharma) याने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून भारतवासीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्याने त्याचा हातात तिरंगा घेतलेला फोटो ट्वीट करत त्याला ‘७५ वर्षाचे स्वातंत्र. स्वातंत्रदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा’, असे कॅप्शन दिले. मात्र त्याचा हा फोटो भलताच ट्रोल होतोय. चाहते त्याच्या फोटोवरून शेरलॉक बनले असून त्यांनी हा फोटो इडिट किंवा फोटोशॉप केला आहे, असे ट्वीट्सही केले आहेत.
या फोटोमध्ये रोहितने हातात झेंडा घेऊन पारंपरिक वेशभुषेत असलेला क्लिक केले आहे. निरखून पाहिले असता तो झेंडा एडिट केलेला दिसत असून त्याच्या हातातील झेंड्याची काठीही फोटोशॉप केलेली दिसत आहे. त्यातील एका चाहत्याने म्हटले, ‘या मोठ्या खेळाडूंना फोटोशॉप करण्याची काय गरज होती? ते तिरंग्यासोबत एखादा फोटो नाही का काढू शकत?’
https://twitter.com/notnerd12/status/1559397284600692737?s=20&t=tItMnhjtKmmQULwK3QL5Dg
Waah re topibaaz aadmi 🤦♂️ https://t.co/5OJox1JNtv pic.twitter.com/awSHL3BDuZ
— Raga_07 (@Raga_07) August 15, 2022
https://twitter.com/WintxrfellViz/status/1559069916090707969?s=20&t=3ctE6Wew3w-DZkELjwGNyw
This is terrible edit 🥺 just hold a flag and get yourself clicked, would have saved some time but anyway. https://t.co/VfpXyuQMI9
— Archer (@poserarcher) August 15, 2022
रोहितला विराट कोहलीनंतर भारताचा क्रिकेटच्या तिन्ही प्रकाराचा नियमित कर्णधार नेमले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने नुकतेच वेस्ट इंडिजच्या दौऱ्यात टी२० मालिका ४-१ अशी जिंकली आहे. यामधील शेवटच्या सामन्यात हार्दिक पांड्या हा भारताचा कर्णधार होता.
रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ टी२०मध्ये उल्लेखनीय कामगिरी करत आहे. त्याने ३५ टी२० सामन्यांत भारताचे नेतृत्व केले आहे. यामध्ये भारत २९ सामने जिंकला असून त्याची सामना जिंकण्याची टक्केवारी ८२.८५ झाली आहे. त्याने २०१७मध्ये प्रथमच भारताचे टी२० मालिकेत नेतृत्व केले होते. तीन सामन्यांच्या त्या मालिकेत भारताने श्रीलंकेचा ३-०ने पराभव केला होता. तसेच त्याने केवळ २०१९मध्ये न्यूझीलंड विरुद्ध टी२० मालिका गमावली आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
Breaking : विश्वचषकात सर्वात जलद शतक करणारा ‘हा’ दिग्गज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून रिटायर
‘फुटबॉलप्रमाणेच क्रिकेटची वाटचाल सुरू आहे’, कपिल देवने केली थेट आयसीसीला विनंती
टीम इंडियातील कर्णधार बदलीवर काय म्हणाला ‘दादा’, वाचा सविस्तर