बर्मिंगहॅम। भारत विरुद्ध इंग्लंड संघात एजबस्टन मैदानावर पहिला कसोटी सामना सुरु आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी (शुक्रवार, 3 आॅगस्ट) उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जॉन्ग-उन यांचा मास्क घातलेला एक व्यक्ती स्टेडियममध्ये अचानक आल्याने सोशल मिडियावर चर्चांना उधान आले आहे.
किम जॉन्ग-उन बरोबरच एका चाहत्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मास्क घातला होता. किम यांचा मास्क घातलेला चाहता सुरक्षा रक्षकांच्या घेराव्यासह स्टेडियममध्ये आला. त्यानंतर त्याने ट्रम्प यांचा मास्क घातलेल्या दुसऱ्या चाहत्याशी हातही मिळवला.
ट्रम्प आणि किम हे दोघे यावर्षी जूनमध्ये भेटले होते. उत्तर कोरियाने या दरम्यान कोरियाला अण्वस्त्रमुक्त करण्याचे वचन दिले होते तसेच अमेरिकेने उत्तर कोरियाला सुरक्षेची हमी देत दक्षिण कोरियाबरोबर होणारे लष्करी सराव थांबविण्याचे जाहीर केले होते.
या सामन्यात इंग्लंडने दुसऱ्या डावात 35 षटकात 7 बाद धावा केल्या आहेत. भारताकडून या डावात इशांत शर्माने 4 आणि आर अश्विनने 3 विकेट्स घेतल्या आहेत.
Kim Jong-Un in the house at Edgbaston with his nuke😂#INDvENG #ENGvIND pic.twitter.com/BLbS09FTMM
— Tanmay (@sentiyapaa) August 3, 2018
The @bbctms commentary of Kim Jong-Un turning up to the Hollies stand was the best few minutes of commentary in the history of radio
— Elias McGill (@EliasMcGill) August 3, 2018
Kim Jong-un loves a bit of cricket when of course he's not reading The Garden of Jane Pengelly. pic.twitter.com/Ke2ataFskP
— Steve Wells (@BilsenDal) August 3, 2018
Who knew Kim Jong-un was such a bigly cricket fan? Obviously not all bad then. #ENGvIND #ENGvsIND #BBCCricket #BBCTMS #TMS
— Sir David Merson FRSMCA (@DavidMerson) August 3, 2018
Kim Jong-Un in the house at Edgbaston with his nuke😂#INDvENG #ENGvIND pic.twitter.com/yaDTDqEjj9
— Manojkumar (@manojt4sap) August 3, 2018
Kim jong-Un turns up @edgbaston with rocket 🚀 in hand and about 20 bodyguards 🤣🤣🤣 @SkyCricket @CricketJokes @TrollCricket3 pic.twitter.com/MBekrLB3Ne
— Mi Deh Yah (@royepablo) August 3, 2018
https://twitter.com/Smallclone/status/1025340703122104320
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–विराट-अश्विन जोडी खास, आजपर्यंत इतिहासात अन्य कोणत्याही जोडीला हे जमले नाही
–अश्विनचा जलवा! पुन्हा विकेट्स पुन्हा नवा पराक्रम
–कालच्या शतकापेक्षा त्या सामन्यातील शतक माझ्यासाठी खास- विराट कोहली