---Advertisement---

आयपीएलचा बादशाह विराटच! ओपनर म्हणून पार केला ‘एवढ्या’ धावांचा टप्पा, कोहलीप्रेमींना वाचाच

Virat-Kohli
---Advertisement---

इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेत 2008 ते 2022 यादरम्यान 15 हंगाम खेळून एकही विजेतेपद न जिंकणाऱ्या संघांमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचाही समावेश होतो. असे असले, तरीही बेंगलोरचा माजी कर्णधार आणि विस्फोटक फलंदाज विराट कोहली हा आयपीएल इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात यशस्वी फलंदाज आहे. विराटने आयपीएल 2023 स्पर्धेतील पहिला सामना खेळताना एक खास विक्रम नावावर केला आहे. यामुळे तो अशी कामगिरी करणारा सातवा फलंदाज ठरला आहे.

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स (Royal Challengers Bangalore vs Mumbai Indians) संघात आयपीएल 2023 स्पर्धेचा पाचवा सामना रविवारी (दि. 2 एप्रिल) रंगला. एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर पार पडलेल्या या सामन्यात बेंगलोरने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. तसेच, मुंबईला फलंदाजीसाठी पाचारण केले होते. यावेळी मुंबईने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 7 विकेट्स गमावत 171 धावा केल्या. तसेच, बेंगलोरला 172 धावांचे आव्हान दिले.

सलामीवीर म्हणून विराटचा विक्रम
या आव्हानाचा पाठलाग करताना बेंगलोरकडून विराट कोहली (Virat Kohli) आणि फाफ डू प्लेसिस (Faf Du Plessis) सलामीला उतरले होते. विराटने यावेळी फलंदाजी करताना 26 चेंडूत 32 धावांचा आकडा गाठताच त्याच्या नावावर खास विक्रम नोंदवला गेला. आयपीएलमध्ये सलामीला फलंदाजी करताना विराटच्या 3000 धावा (Virat Kohli 3000 Runs As A Opener In IPL) पूर्ण झाल्या. अशी कामगिरी करणारा तो सातवा फलंदाज ठरला. या सामन्यात विराटने 38 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. हे त्याचे आयपीएलमधील 44 वे अर्धशतक होते. या धावा करताना त्याने 2 षटकार आणि 4 चौकारांचा पाऊस पाडला.

https://twitter.com/RCBTweets/status/1642575573653532672

सलामीवीर म्हणून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वलस्थानी शिखर धवन (Shikhar Dhawan) आहे. त्याने 206 सामन्यातील 187 डावांमध्ये 35.40च्या सरासरीने 5877 धावा केल्या आहेत.

आरसीबीचा 13 षटकांनंतरचा डाव
मुंबईच्या आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीने 13 षटकांपर्यंत एकही विकेट गमावली नाही. फाफ आणि विराटने यावेळी अधिकचे फक्त 4 धावा घेत 129 धावा धावफलकावर लावल्या. यामध्ये विराटच्या 55, तर फाफच्या 70 धावांचा समावेश होता. या षटकापर्यंत आरसीबीला विजयासाठी 42 चेंडूत 43 धावांची गरज होती. अशात या दोघांची फलंदाजी पाहून हा सामना आरसीबी सहजरीत्या जिंकेल, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. (fantastic record by king Virat Kohli he completed 3000 runs as an opener in IPL)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पहिल्याच सामन्यात आरसीबीला धक्का! चालू सामन्यात निखळला प्रमुख गोलंदाजाचा खांदा, दुखापत गंभीर
फक्त 1 धाव करूनही हिटमॅन ‘रेकॉर्ड बुक’मध्ये! सचिननंतर रोहित दुसराच

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---