---Advertisement---

IPL2022| राजस्थान वि. लखनऊ सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!

On: रविवार, एप्रिल 10, 2022 1:32 PM
RR-vs-LSG-Dream-11
---Advertisement---

मुंबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामातील चौथा डबल हेडर (एका दिवशी दोन सामने) रविवारी (१० एप्रिल) होणार आहे. रविवारचा दुसरा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनऊ सुपरजायंट्स संघात होणार आहे. हंगामातील हा २०वा सामना असून वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे होणार आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होणार आहे. तसेच त्याआधी ७ वाजता नाणेफेक होईल. या सामन्यासाठी कशी ड्रीम ११ असू शकते हे पाहू.

असा असू शकतो राजस्थानचा संभावित संघ
राजस्थान संघाने (Rajasthan Predicted Playing Xi) आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. त्यांनी आतापर्यंत ३ सामने खेळले असून फक्त १ सामना गमावला आहे. नवख्या लखनऊविरुद्ध पहिल्यांदाच राजस्थानची लढत होणार आहे. या सामन्यात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन विजयी कॉम्बिनेशनमध्ये जास्त बदल टाळेल.

फॉर्मात असलेला जोस बटलर (Jos Buttler) आणि यशस्वी जयस्वाल सलामीला फलंदाजीला येतील. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर देवदत्त पडिक्कल फलंदाजीसाठी उतरेल. मधळी फळी संजू सॅमसन, शिमरॉन हेटमायर सांभाळतील. रियान पराग मागील काही सामन्यात विशेष प्रभाव पाडू शकलेला नाही. त्यामुळे त्याची जागा जेम्स नीशम घेऊ शकतो. गोलंदाजी विभागात, प्रसिद्ध कृष्णा, नवदीप सैनी आणि ट्रेंट बोल्ट असतील. तर रविचंद्रन अश्विन आणि युझवेंद्र चहल फिरकी गोलंदाजीचा विभाग सांभाळतील.

राजस्थान रॉयल्स (संभावित संघ)
जोस बटलर, यशस्वी जयस्वाल, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (कर्णधार आणि यष्टीरक्षक), शिमरॉन हेटमायर, रियान पराग/जेम्स नीशम, रविचंद्रन अश्विन, नवदीप सैनी, ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा, युझवेंद्र चहल.

असा असू शकतो लखनऊचा संभावित संघ
लखनऊ संघ (Lucknow Supergaints Predicted Playing Xi) सध्या विजयरथावर स्वार आहे. त्यांचे सर्व खेळाडूही चांगले प्रदर्शन करताना दिसत आहेत. लखनऊकडून इतर सामन्यांप्रमाणे कर्णधार केएल राहुल सलामीला फलंदाजीला येईल. त्याच्याबरोबर यष्टीरक्षक क्विंटन डी कॉक सलामीला फलंदाजीसाठी उतरेल. तिसऱ्या क्रमांकावरील एविन लुईसची मागील काही सामन्यातील कामगिरी पाहता त्याच्याजागी मार्कस स्टॉयनिसला प्लेइंग इलेव्हनमध्ये सहभागी केले जाऊ शकते.

वरची फळी फेल ठरल्यानंतर दीपक हुडा आणि आयुष बदोनी संघाचा डाव सावरतील. तसेच कृणाल पंड्या, जेसन होल्डर (Jason Holder) आणि कृष्णप्पा गौथम या अष्टपैलू खेळाडूंनाही अंतिम एकादशमध्ये जागा मिळेल. तसेच वेगवान गोलंदाज अँड्र्यू टाय आणि आवेश खान पुन्हा त्यांचा फॉर्म दाखवताना दिसतील. तर फिरकीपटू म्हणून रवी बिश्नोईची जागा निश्चित आहे.

लखनऊ सुपरजायंट्स (संभावित संघ)
केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), एविन लुईस/मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, आयुष बदोनी, कृणाल पांड्या, जेसन होल्डर, कृष्णप्पा गौतम, अँड्र्यू टाय, रवी बिश्नोई, आवेश खान.

अशी असू शकते ड्रीम ११
राजस्थान विरुद्ध लखनऊ संघांच्या ड्रीम ११चा (Dream 11) विचार करायचा झाल्यास, राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन आणि लखनऊच्या सलामीवीर क्विंटन डी कॉक यांना यष्टीरक्षक म्हणून घेऊ शकता. तर अष्टपैलू विभागात धाकड जेसन होल्डर आणि आयुष बदोनी यांना घेऊ शकता. हे दोन्ही खेळाडू सध्या फॉर्मात आहेत, त्यामुळे हे खेळाडू तुम्हाला पैसा वसूल करून देऊ शकतात. फलंदाज म्हणून जोस बटलर, देवदत्त पडीक्कल आणि लखनऊचा कर्णधार केएल राहुल यांना घेऊ शकता. तर युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, आवेश खान आणि ट्रेंट बोल्ट या गोलंदाजांवर दाव लावू शकता. यापैकी जोस बटलरला कर्णधार आणि जेसन होल्डरला उपकर्णधार करता येईल.

कर्णधार – जोस बटलर
उपकर्णधार – जेसन होल्डर
यष्टीरक्षक – संजू सॅमसन, क्विंटन डी कॉक
फलंदाज – जोस बटलर, देवदत्त पडीक्कल, केएल राहुल
अष्टपैलू – आयुष बदोनी, जेसन होल्डर
गोलंदाज – युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, आवेश खान, ट्रेंट बोल्ट

महत्त्वाच्या बातम्या-

आयपीएलमध्ये चौकार-षटकारांच्या ‘या’ विक्रमात विराटच ‘किंग’, आजपर्यंत कोणालाच न जमलेला विक्रम नावावर

आयपीएलच्या मध्यात हर्षल पटेलवर कोसळला दुःखाचा डोंगर; मायेचा आधार कायमचा हरपला

IPL 2022 | केव्हा आणि कुठे पाहाल राजस्थान वि. लखनऊ सामना, कशी असेल खेळपट्टी; जाणून घ्या सर्वकाही

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---