---Advertisement---

‘त्याच्यातील उत्साहाला मारू नका,’ अर्जुन तेंडूलकरच्या ट्रोलर्सला बॉलिवूड सुपरस्टारकडून जोरदार प्रत्युत्तर

On: रविवार, फेब्रुवारी 21, 2021 11:41 AM
aRJUN tENDULKAR
---Advertisement---

नुकताच इंडियन प्रीमीयर लीगच्या चौदाव्या हंगामाचा मिनी लिलाव पार पडला आहे. या लिलावात उतरलेल्या भारतीय दिग्गज सचिन तेंडूलकरचा मुलगा अर्जुन तेंडूलकर याला मुंबई इंडियन्स संघात स्थान मिळाले आहे. २० लाखांच्या मुळ किंमतीला मुंबईने त्याला आपल्या ताफ्यात सहभागी केले आहे. लिलावाला २ दिवस उलटले तरीही अर्जुनला ट्रोलर्सचा सामना करावा लागत आहेत. अशात बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता फरहान अख्तर याने अर्जुनला पाठिंबा देत ट्रोलर्सवर निशाणा साधला आहे.

अभिनयासह चित्रपटांचे दिग्दर्शन करणाऱ्या फरहानने ट्विट करत लिहिले आहे की, ‘मला वाटते की याक्षणी मी अर्जुनविषयी हे सांगितले पाहिजे. आम्ही दोघे एकाच जिममध्ये जातो. तिथे मी पाहिले की तो आपल्या फिटनेसवर किती मेहनत घेतो. त्याचे पूर्ण लक्ष एक यशस्वी क्रिकेटपटू बनण्यावर आहे. त्याच्यावर नेपोटिझमसारखा शब्द लादणे चुकीचे आहे आणि ही अतिशय निर्दयी बाब आहे. तुम्ही त्याची क्रिकेट कारकिर्द सुरू होण्याआधीच त्याच्यातील उत्हासाला मारू नका.’

फरहानच्या या ट्विटवर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी त्याचे समर्थन केले आहे; तर अनेकांनी उलट त्यालाच धारेवर धरले आहे.

अर्जुनचा पिता सचिन हा जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक आहे. तोदेखील आपल्या संपूर्ण आयपीएल कारकिर्दीत मुंबई इंडियन्सच्या संघाचाच भाग होता. त्यांनतर आता ज्युनिअर तेंडूलकरला अर्थात अर्जुनलाही पाच वेळच्या विजेत्या मुंबईच्या संघाने आपल्या ताफ्यात स्थान दिले आहे. त्यामुळे अनेकांनी याला नेपोटिझमचे नाव देत अर्जुनवर टीका केली आहे.

असे असले तरी, सर्व टीकांवर दुर्लक्ष करत अर्जुन आपल्या उज्ज्वल भविष्यावर लक्ष केंद्रित करत आहे. रोहित शर्माच्या मुंबई संघाने अर्जुनला संधी दिल्यामुळे त्याने त्यांचे आभार मानले आहेत.

तो म्हणाला की, “मी लहानपणापासूनच मुंबई इंडियन्सच्या संघाचा मोठा चाहता आहे. मला संघात सामील करून घेतल्याबद्दल आणि माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल संघ मालक, संघाचे प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफ यांचा मी आभारी आहे. मुंबईच्या संघात सामील होण्यासाठी मी अतिशय उत्सुक आहे. आणि सोनेरी किनार असलेली निळी जर्सी परिधान करण्यासाठी मी अधीर झालो आहे.”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---