---Advertisement---

दक्षिण आफ्रिकी क्रिकेटरने बीसीसीआयपुढे जोडले हात; म्हणे, ‘जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट राष्ट्राने आमच्या देशात यावेच’

On: शनिवार, नोव्हेंबर 27, 2021 10:37 PM
---Advertisement---

कोविड-१९ महामारीचा फटका सहन केल्यानंतर आता क्रिकेटविश्व हळूहळू पूर्वपदावर येते आहे. भारतातील कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता संयुक्त अरब अमिराती आणि ओमानमध्ये काही दिवसांपूर्वीच टी२० विश्वचषकही यशस्वीपणे पार पडला आहे. परंतु यानंतर आता दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवा व्हेरिएंट सापडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. भारतीय संघाचा आगामी दक्षिण आफ्रिका दौराही यामुळे संकटात सापडला आहे.

भारतीय संघाच्या या दौऱ्यावर टांगती तलवार असल्याने दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू फरहान बेहरदीन चिंतीत आहे. त्याने सोशल मीडियाद्वारे भारतीय संघाला हा दौरा रद्द न करण्याची विनवणी केली आहे.

बेहदरीनने ट्वीट करत वरिष्ठ भारतीय संघाने कोणत्याही स्थितीत दक्षिण आफ्रिकेचा करावा, अशी विनंती केली आहे. त्याने ट्वीट करत लिहिले आहे की, ‘भारतीय संघाच्या येत्या दक्षिण आफ्रिकी दौऱ्यासंदर्भात मला अपेक्षा आहे की, जगातील हे सर्वात मोठे क्रिकेट राष्ट्र नक्कीच पुढील महिन्यात आमच्या देशाचा दौरा करेल. दक्षिण आफ्रिका क्रिकेटच्या भावी पिढीसाठी हा दौरा होणे अत्यंत गरजेचे आहे.’ या ट्वीटसोबत बेहदरीनने हात जोडून विनंती करत असल्याचा इमोजीही टाकला आहे.

दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवा व्हेरिएंट सापडल्याने इतर संघ या देशाचा दौरा रद्द करताना दिसत आहेत. नुकतीच नेदरलँड क्रिकेटने कोरोनामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धची ३ सामन्यांची वनडे मालिका पुढे ढकलली आहे.

मात्र बीसीसीआयने अद्याप भारतीय वरिष्ठ संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यासंबंधी कोणताही निर्णय घेतलेला नाही. येत्या काळात या दौऱ्यासंबंधी योग्य तो निर्णय घेतला जाणार असल्याचे बीसीसीआयचे म्हणणे आहे. तसेच सध्या दक्षिण आफ्रिकेत असलेल्या भारत अ संघाचेही पुढील सामने निश्चित वेळापत्रकानुसार होणार आहेत.

डिसेंबर २०२१ मध्ये जोहान्सबर्ग येथील पहिल्या कसोटी सामन्याने भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याची सुरुवात होणार आहे. या दौऱ्यामध्ये ३ कसोटी सामने, ३ वनडे सामने आणि ४ टी२० सामन्यांची मालिका होणार आहे. २६ जानेवारी रोजी चौथ्या टी२० सामन्याने हा दौरा संपेल. त्यामुळे आता बीसीसीआय वरिष्ठ संघाच्या या मोठ्या दौऱ्यासंदर्भात काय निर्णय घेईल? हे पाहावे लागेल.

महत्त्वाच्या बातम्या-

शतकवीर अय्यरची तुलना होतेय ‘त्या’ कमनशिबी खेळाडूशी; ‘हे’ आहे कारण

पुढील आयपीएलमध्ये ‘मुंबईकर’ होणार श्रेयस? लिलावात होईल धनवर्षा

“धोनीवर १५ टक्के रक्कम खर्च करणे म्हणजे नुकसानच”; दिग्गजाची सीएसकेवर टीका

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---