---Advertisement---

तुम्ही त्यांना दोषी ठरवू शकत नाही; ‘त्या’ प्रकरणावरुन भारतीय दिग्गजाचा विराट-शास्त्री यांना पाठिंबा

Virat-Kohli-Ravi-Shastri
---Advertisement---

भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या ‘स्टारगेजिंग- द प्लेयर्स इन माय लाइफ’ पुस्तकाचा पुस्तक प्रकाशन कार्यक्रम ३१ ऑगस्टला लंडन येथे पार पडला. या कार्यक्रमासाठी भारतीय प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहलीसह अन्य भारतीय खेळाडूही सहभागी झाले होते. कार्यक्रमानंतर दोन दिवसांनी चौथ्या कसोटीला सुरुवात झाली आणि सामन्याच्या दुसऱ्या दिवशी रवी शास्त्री, गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर हे तिघे कोरोना पाॅझिटिव्ह आढळले होते. याच पार्श्वभूमीवर पाचवा कसोटी सामना रद्द करावा लागला.

सामना रद्द झाल्यामुळे रवी शास्त्र आणि विराट कोहलीला जबाबदार धरले जात असून त्यांच्यावर टीका होत आहेत. अशात भारताचे माजी यष्टीरक्षक फलंदाज फारुख इंजिनियर यांनी विराट आणि शास्त्री यांची बाजू घेत प्रतिक्रिया दिली आहे.

फारुख यांनी स्पोर्ट्स तकला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “लोकं याच्यासाठी शास्त्रीला जबाबदार ठरवत आहेत. त्यांनी भारतीय क्रिकेटसाठी चमत्कार केला आहे. शास्त्री आणि विराट दोघांनी जबरदस्त प्रदर्शन केले आहे. तुम्ही त्यांना बुक पुस्तक प्रकाशन कार्यक्रमास जाण्यासाठी दोषी ठरवू शकत नाही. ते हाॅटेलच्या बाहेर गेले नव्हते. ते आतमध्येच होते. असे कोणालाही दोष देणे सोपे असते.”

ते पुढे म्हणाले, “लोकं सेल्फी घेण्यासाठी नेहमी आमच्या जवळ येत असतात आणि प्रत्येक वेळी तुम्ही नाही म्हणू शकत नाही. शास्त्री आणि विराटनेही तेच केले असेल, नाहीतर लोकांसोबत हात मिळवला असेल. पण त्यांना कसे कळणार की, कोण कोरोना पाॅझिटिव्ह आहे. त्यामुळे, तुम्ही प्रत्यक्षात शास्त्री आणि विराटला दोष देऊ शकत नाही. मला वाटते की, त्यांच्यावर खूप दोष लावले गेले आहेत.”

पाचवा कसोटी सामना रद्द झाल्यानंतर माध्यमांमधील बातम्या पाहून फारुख हैराण झाल्याचे दिसत आहे. याबाबत ते म्हणाले, “ही मोठी बातमी आहे पण निराशाजनकही आहे. ईमानदारीने सांगायचे झाले तर मला नाही माहित की, काय चालले आहे. कारण आम्हाला खराब रिपोर्ट मिळत आहेत. एकीकडे मी ऐकत आहे की, भारताचे ११ खेळाडू खेळण्यासाठी फिट आहेत. तर इंग्लंडमधील पत्रकारांनी असा दावा केला आहे की, भारतीय संघाने मैदानात उतरण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांनी ईसीबीकडे खेळ रद्द करण्याची विनंती केली आहे.”

“हे निराशाजनक आहे. कारण आपण इंग्लंडला हरवून ३-१ ने मालिका जिंकण्याची आशा करत होतो. मात्र दुर्दैवाने असे होणार नाही. याबाबत मला माहित असते, तर मी तुम्हाला अजून माहिती दिली असती,” असेही फारुख म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

नेमके बीसीसीआयने धोनीला टीम इंडियाचा मार्गदर्शक का बनवले? ‘माही’च्या सर्वात मोठ्या प्रशंसकाचाच सवाल

आयपीएल तोंडावर असताना उसळला नवा वाद, ‘या’ कारणामुळे फ्रँचायझींचे बीसीसीआयला पत्र

लाईव्ह सामन्यात अचानक घुसला कुत्रा, चेंडू घेऊन मैदानभर क्रिकेटर्संना पळवले; व्हिडिओ पाहून व्हाल लोटपोट

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---