---Advertisement---

नया है यह! वेगवान गोलंदाजाने टाकलेला चेंडू झाला स्पिन, फलंदाजाच्याही उडाल्या दांड्या

On: मंगळवार, मे 24, 2022 4:12 PM
Swing
---Advertisement---

क्रिकेटमध्ये गोलंदाजांचे प्रामुख्याने दोन प्रकार प्रचलित आहेत. एक म्हणजे जलद गतीचे गोलंदाज (Fast Bowler) आणि दुसरे फिरकीपटू (Spin Bowler). मात्र, जर एखाद्या जलद गतीच्या गोलंदाजाने फिरकीपटूप्रमाणे चेंडू स्पिन केला आणि त्या चेंडूवर फलंदाजाला बाद केले तर तो क्षण क्रिकेटच्या एतिहासात सुवर्णअक्षरांनी लिहीला जाऊ शकतो. असाच कारनामा केला आहे, मिल्डेनहॉल क्रिकेट क्लबच्या जलद गतीच्या गोलंदाजाने. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही आश्चर्याचा धक्का नक्कीच बसेल.

मिल्डनहॉल क्रिकेट क्लबच्या एका गोलंदाजाने हॅडली क्रिकेट क्लबच्या एका फलंदाजाला वेगवान गोलंदाजासारखा चेंडू टाकला, पण तो इतका वळला की फलंदाज त्रिफळाचीत झाला. अनेकदा असा चेंडू यष्टीरक्षकाच्या ग्लोव्हमध्ये जातो, मात्र व्हिजिओमध्ये दिसते की, चेंडू वळून फलंदाजाचा ऑफ-स्टंप उडवल्याचे दिसून आले. वेगवान गोलंदाजाच्या चेंडूवर अशी हालचाल फार क्वचितच पाहायला मिळते.

 

View this post on Instagram

 

A post shared by MildenhallCC (@mildenhallcc)

वेगवान गोलंदाज स्विंग बॉलवर अशी विकेट घेऊ शकतो, परंतु व्हिडिओमध्ये पाहता, चेंडू वळल्याचे दिसून येते. आशावेळी चेंडू खेळपट्टीवरील तडा गेलेल्या भागावर पडला आणि सरळ न जाण्याऐवजी चेंडू थोडासा स्टंपच्या दिशेने गेला असे देखील होऊ शकते. याशिवाय, गोलंदाजाने कटर टाकण्याचा प्रयत्न केला असू शकतो. मात्र ही वेगवान फिरकी असल्याचेही चाहत्यांचे म्हणणे आहे.

दरम्यान, अनेकदा असे अचंबित करणारे प्रसंग आंतरराष्ट्रीय स्तरावरही दिसून येतात. ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये फलंदाजाने चेंडू न खेळता सोडून देणे योग्य मानले. परंतु, चेंडू अनपेक्षितपणे त्रिफळा उडवून गेला. अशीच काहीशी घटना भारताचा जलद गतीचा गोलंदाज भुवनेश्वर कुमारच्या (Bhuvneshwar Kumar) पहिल्या आंतराष्ट्रीय सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर झाल्याची पहायला मिळाले होते.

भुवनेश्वरने पाकिस्तान विरुद्धच्या मालिकेत भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यावेळी पहिल्याच चेंडूवर अप्रतिम इन-स्विंग फेकत भुवनेश्वरने पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद हाफिज (Mohammad Hafiz) याला बाद केले होते.  भुवनेश्वरच्या नावे पदार्पणात पहिल्याच चेंडूवर फलंदाजाला बाद करण्याचा विक्रम आहे जो आजवर कोणत्याही नवीन गोलंदाजाला मोडता आलेला नाही.

हेही वाचा

‘…तर मी पुढच्या वर्षी चेन्नईसाठी खेळू शकतो’, वाचा असं का म्हणाला अमीर खान

Video: यॉर्करवर उत्तर शोधण्यासाठी परागने घेतली थेट मलिंगाचीच मदत, पाहा रियानचा खास ‘रियाज’

आयर्लंड दौऱ्यावर व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मणला मिळणार भारतीय संघाची कमान? वाचा सविस्तर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---