---Advertisement---

आयर्लंड दौऱ्यावर व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मणला मिळणार भारतीय संघाची कमान? वाचा सविस्तर

On: मंगळवार, मे 24, 2022 2:27 PM
VVS-Laxman
---Advertisement---

सध्या ज्याची सर्वाधिक चर्चा आहे, तो इंडियन प्रीमिअर लीग २०२२चा हंगाम अवघ्या काही दिवसांचा पाहुणा आहे. साखळी फेरी संपली असून आता प्लेऑफ फेरी मंगळवारपासून (दि. २४ मे) सुरू होतेय, तर अंतिम सामना २९ मे रोजी खेळवला जाणार आहे. यानंतर भारतीय संघाची स्वारी पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मैदानावर परतेल. इथे त्यांना जून महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आपल्याच मायदेशात टी२० मालिका खेळायची आहे. यानंतर आयर्लंड दौऱ्यावर भारतीय संघाची कमान व्हीव्हीएस लक्ष्मणकडे असू शकते.

भारताच्या युरोप दौऱ्यावर व्हीव्हीएस लक्ष्मणला मिळणार प्रशिक्षकपद
भारतीय संघाला (Team India) मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ९ जून ते १९ जून दरम्यान ५ सामन्यांची टी२० मालिका (T20I Series) खेळायची आहे. यानंतर भारतीय संघ युरोप दौऱ्यावर जाणार आहे. इथे त्यांना आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्ध खेळायचे आहे.

भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका संपताच आयर्लंडसाठी रवाना होईल. तिथे भारताला २८ आणि २९ जूनमध्ये २ सामन्यांची टी२० मालिका खेळायची आहे. दुसरीकडे, भारतीय संघाला इंग्लंड दौऱ्यावर २४ जून रोजी सराव सामना खेळायचा आह

इंग्लंडसाठी राहुल द्रविड, तर आयर्लंडमध्ये असेल व्हीव्हीएस लक्ष्मण
युरोपात एकाच वेळी वेगवेगळ्या मालिकांसाठी भारतीय क्रिकेट संघाचे व्यस्त वेळापत्रक पाहता बीसीसीआय (BCCI) आयर्लंड दौऱ्यावर  (Ireland Tour) व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) याच्याकडे भारतीय संघाची कमान सोपवणार असल्याचे वृत्त आहे. असे म्हटले जात आहे की, व्हीव्हीएस लक्ष्मणकडे संघाच्या प्रशिक्षकपदाची नाही, तर संचालकाच्या पदाची जबाबदारी दिली जाईल.

भारतीय संघ रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वात १५ जून रोजी इंग्लंडला रवाना होईल. दुसरीकडे, राहुल द्रविड १९ जूनला दक्षिण आफ्रिका दौरा संपवून इंग्लंडला रवाना होईल. इंग्लंडविरुद्धचा पुनर्नियोजित अंतिम कसोटी सामना १ जुलै रोजी सुरू होईल.

आयर्लंड दौऱ्यावर लक्ष्मणचे संचालक बनणे निश्चित
भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) १९ जून रोजी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे, त्यामुळे व्हीव्हीएस लक्ष्मणला आयर्लंड दौऱ्यावर मुख्य प्रशिक्षकाऐवजी संचालकाच्या पदावर संघासोबत पाठवले जाईल.

सूत्रांनी दिलेल्या वृत्तांनुसार, बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने आपल्या निवेदनात म्हटले की, “हो हे शक्य आहे की, दोन संघ एकाच वेळा प्रवास करतील. जो संघ आयर्लंड दौऱ्यावर जाईल, त्या संघाच्या प्रशिक्षकपदाऐवजी संचालकाची जबाबदारी व्हीव्हीएस लक्ष्मणकडे सोपवण्याची शक्यता आहे. त्यासाठी संघाचे काही अधिकारी लक्ष्मणच्या संपर्कात आहे.”

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

व्हीव्हीएस लक्ष्मण याने ८६ वनडे सामने खेळले आहेत आणि ३०.७६च्या सरासरीने २३३८ धावा केल्या आहेत. त्याने ६ शतके, तर १० अर्धशतके झळकावली आहेत. याव्यतिरिक्त त्याने १३४ कसोटी सामने खेळताना २२५ डावात ८७८१ धावा चोपल्या आहेत. या धावा त्याने ४५.९७च्या सरासरीने केल्या आहेत. यामध्ये १७ शतके आणि ५६ अर्धशतकेही चोपली आहेत.

चार वर्षात आयपीएलचे विजेते बदलले, पण पंजाबने आपली जागा नाही सोडली; पाहा काय केलाय पराक्रम

भारताकडून खेळला नाही, पण आयपीएलमध्ये चमकला हैदराबादचा पठ्ठ्या; संघसहकारी त्रिपाठीला पछाडत रचला खास विक्रम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---