---Advertisement---

ईशांतच्या वक्तव्यामुळे क्रिकेटजगतात खळबळ! म्हणाला, जेम्स अँडरसनपेक्षा ‘हा’ भारतीय सर्वोत्तम

Ishant-Sharma-And-James-Anderson
---Advertisement---

जागतिक क्रिकेटमध्ये दिग्गज गोलंदाजांची जेव्हाही चर्चा होते, तेव्हा त्यात इंग्लंडचा जेम्स अँडरसन याच्यासारख्या गोलंदाजाचे नाव आपसुकच तोंडात येते. सध्याच्या घडीला अँडरसन भारताचा फिरकीपटू आर अश्विन याच्यानंतर गोलंदाजांच्या आयसीसी क्रमवारीत दुसऱ्या स्थानी आहे. त्याचे 829 गुण आहेत. तसेच, त्याने कसोटीत आतापर्यंत 686 विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत. तो अशी कामगिरी करणारा जगातील तिसराच खेळाडू आहे. अशात भारताचा वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा याने अँडरसनविषयी मोठे भाष्य केले आहे.

भारताचा अनुभवी स्टार गोलंदाज ईशांत शर्मा (Ishant Sharma) याने 40 वर्षीय जेम्स अँडरसन (James Anderson) याच्या कारकीर्दीविषयी वादग्रस्त प्रश्न उपस्थित केले आहे. त्याने एका युट्यूब चॅनेलच्या पॉडकास्टमध्ये म्हटले की, जर अँडरसन भारताकडून खेळत असता, तर त्याची कारकीर्द तशी नसती. यापूर्वी त्याने अँडरसनची तुलना भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान (Zaheer Khan) याच्याशी केली.

‘अँडरसनपेक्षा सर्वोत्तम आहे झहीर खान’
ईशांतला विचारले गेले की, त्याने अँडरसनशी त्याच्या गोलंदाजी आणि वाढत्या वयाविषयी कधी चर्चा केली आहे का? यावर ईशांत म्हणाला की, अँडरसन एका भारतीय गोलंदाजाच्या तुलनेत खूपच वेगळ्या स्थितीत प्रशिक्षण घेतले आहे आणि गोलंदाजी केली आहे. तो म्हणाला, “जेम्स अँडरसनची गोलंदाजी शैली आणि पद्धत खूपच वेगळी आहे. तो इंग्लंडमध्ये वेगवेगळ्या परिस्थितीत खेळतो. होऊ शकते की, जर तो भारतात खेळला असता, तर कदाचित त्याला त्याप्रकारचे यश मिळाले नसते. जॅक, तो जिमी अँडरसनपेक्षा सर्वोत्तम होता.”

ईशांतने केली झहीरच्या विकेट्सची बरोबरी
विशेष म्हणजे, झहीर खान याने 2014मध्ये भारताकडून शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्याने 14 वर्षांच्या दीर्घ कसोटी कारकीर्दीदरम्यान भारतासाठी 311 विकेट्स घेतल्या आहेत. खरं तर, ईशांतच्या नावावरही कसोटीत 311 विकेट्स असून त्याने झहीर खानची बरोबरी केली आहे. (fast bowler ishant sharma zaheer khan is better than james anderson)

महत्वाच्या बातम्या-
भारतीय संघाला मोठा धक्का, आशिया चषकातून ‘हा’ हुकमी एक्का बाहेर! लगेच वाचा
सरफराजची टीम इंडियात निवड न होण्यामागील मोठे कारण आले समोर, बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने वाचला चुकांचा पाढा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---