मुंबई इंडियन्सचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आयपीएल 2023 हंगाम खेळणार नसल्यामुळे फ्रँचायझीची डोकेदुखी वाढली होती. पण अशातच आता मुंबई इंडियन्ससाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. इंग्लंडचा दिग्गज आणि आयपीएलमध्ये मुंबईशी करारबद्द असलेला जोफ्रा आर्चर आगमी आयपीएल हंगामासाठी पूर्णवेळ उपलब्ध असणार आहे.
जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) मागच्या मोठ्या काळापासून दुखापतीमुळे क्रिकेटच्या मैदानातून बाहेर आहे. मागच्या जवळपास 6 महिन्यांपासून विश्रांती आणि दुखापतीतून सावरण्याच्या प्रयत्नात असलेला जसप्रीत बुमराह अद्यापही दुखपातीशी झुंज देत असल्याचेच दिसते. याच कारणास्तव त्याने आगामी आयपीएल हंगामातून देखील माघार घेतली. अशात मुंबईला आगामी हंगामात वेगवान गोलंदाजाची कमी जाणवणार होती. पण तितक्यातच जोफ्रा आर्चर (Jofra Archer) आयपीएल 2023 (IPL 2023) साठी उपलब्ध असणार, अशी माहिती मिळाली. इंग्लंड आणि वेस्ल क्रिकेट बोर्डाकडूनही आर्चर आयपीएलच्या आगामी हंगामात खेळणार असल्याची पुष्टी केली गेली आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार ईसीबीच्या एका सूत्राने माहिती दिली की, जोफ्रा आर्चर आयपीएलच्या संपूर्ण हंगामासाठी उपलब्ध असणार आहे. नेहमीप्रमाणे त्याची फ्रँचायझी आणि ईसीबी त्याच्या वेळापत्रकाचे नियोजन करेल. तसेच एका आयपीएल अधिकाऱ्याने माहिती दिली की, जोफ्रा आर्चर आगामी हंगामासाठी उपलब्ध असेल. दरम्यान, आर्चर बुधवारी (1 मार्च) बांगलादेशविरुद्धच्या वनडे सामन्यात खेळताना दिसला. बांगलादेशच्या ढाकामध्ये हा सामना खेळला गेला, ज्यात आर्चरने 10 षटकात 37 धावा देत दोन विकेट्स नावावर केल्या. मेहदी हसन (7) आणि तस्किन अहमद (14) यांनी आर्चरच्या चेंडूवर विकेट गमावली. इंग्लंडने हा सामना 3 विकेट्सच्या नुकसानाने जिंकला.
दरम्यान, मुंबई इंडियन्सने आयपीएल 2022 पूर्वी झालेल्या मेगा लिलिवात आर्चरसाठी 8 कोटी रुपये खर्च केले होते. आर्चर मागच्या हंगामात खेळणार नाही, हे माहिती असूनही मुंबई फ्रँचायझीने त्याच्या एवढी मोठी रक्कम खर्च केली. पण मुंबईने लावलेला हा पैसा आगमी आयपीएल हंगामात संघाच्या कामी येऊ शकतो. दरम्यान मोठा काळ दुखापतीमुळे मैदानातून बाहेर राहिलेला आर्चर यावर्षी पुन्हा क्रिकेट खेळू लागला. 18 महिन्यांच्या विश्रांतीनंतर त्याने एसटी-20 लीगमध्ये एमआय-केपटाउन संघासाठी पहिला सामना खेळला. (Fast bowler Jofra Archer will be available for Mumbai Indians in IPL 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारताचा दमदार खेळाडू सर्जरीसाठी न्यूझीलंडला होणार रवाना! आर्चरला फिट करणाऱ्या सर्जनला केलंय पाचारण
देशासाठी काहीही! बोटातून रक्त येतानाही स्टार्कने केली गोलंदाजी, व्हिडिओ पाहून तुम्हीही कराल कौतुक