गुरुवारपासून (दि. 06 जुलै) इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील तिसऱ्या ऍशेस कसोटी सामन्याला सुरुवात झाली. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघ प्रथम फलंदाजीला उतरला होता. यावेळी इंग्लंडकडून गोलंदाजी करताना वेगवान गोलंदाज मार्क वूड याने जबरदस्त विक्रम नावावर केला. वूड याने या कसोटीत आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये कोणत्याही खेळाडूने सर्वात वेगवान षटक टाकण्याचा विक्रम रचला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात आपल्या पहिल्याच षटकात वूडने अक्षरश: फलंदाजाला घाम फोडला.
इंग्लंड क्रिकेटने दिली माहिती
मार्क वूड (Mark Wood) याने तिसऱ्या कसोटी सामन्यातील आपल्या पहिल्याच षटकात आग ओकणारी गोलंदाजी केली. त्याने षटकातील पहिला चेंडू 91 मैल प्रति तासाच्या म्हणजेच 146.45 ताशी वेगाने फेकला. यानंतर पुढील दोन्ही चेंडूंवर त्याने गती वाढवून 93 आणि 95 मैल प्रति तास वेगाने चेंडू टाकला. शेवटी वूडने अखेरचे तिन्ही चेंडू 93 मैल प्रति तास, 94 मैल प्रति तास आणि 93 मैल प्रति तास वेगाने टाकले. यातील सर्वात वेगवान चेंडू तिसरा होता. याची गती ताशी 152.88 इतका वेगवान होता. षटक संपताच इंग्लंड क्रिकेटने ट्विटवर पोस्ट शेअर केली की, कोणत्याही गोलंदाजाने गतीच्या बाबतीत हे सर्वात वेगवान षटक आहे.
Mark Wood is BACK!
???? 0.1 – 91mph
???? 0.2 – 93mph
???? 0.3 – 95mph
???? 0.4 – 93mph
???? 0.5 – 94mph
???? 0.6 – 93mphThe fastest over ever at Headingley since records began! ????️#EnglandCricket | #Ashes pic.twitter.com/KYsg6gGnFr
— England Cricket (@englandcricket) July 6, 2023
पीटरसननेही केले कौतुक
इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसन (Kevin Pietersen) याने मार्क वूडला स्पीडोमीटरवर सातत्याने 90 मैल प्रति तासाच्या गतीने धावताना पाहून आश्चर्य व्यक्त केले. त्याने इंग्लंड क्रिकेटच्या पोस्टवर कमेंट करत लिहिले की, “व्हील.” म्हणजेच चाक होय.
Wheels!!!!!
— Kevin Pietersen???? (@KP24) July 6, 2023
कसे होते षटक?
या षटकाविषयी बोलायचं झालं, तर मार्क वूड याचा पहिला चेंडू मार्नस लॅब्यूशेन (Marnus Labuschagne) याने निर्धाव खेळला. लॅब्यूशेनने दुसरा चेंडू बचावात्मकरीत्या खेळला आणि बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने खेळला. पुढचा चेंडू लेग साईडच्या दिशेने गेला. लॅब्यूशेनने हा चेंडू चांगल्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला, पण तो यशस्वी ठरला नाही. चौथा चेंडू पुन्हा लेग साईडला गेला. यावेळी लॅब्यूशेनच्या पॅडवर लागून चौकारासाठी गेला. यावेळी ऑस्ट्रेलियाला 4 धावा मिळाल्या. लॅब्यूशेन याने अखेरचे दोन्ही चेंडू बचावात्मकरीत्या खेळून षटक संपू दिले. वूडने पहिल्या षटकानंतरही सातत्याने 90 मैल प्रति तास वेग कायम ठेवला.
वूडची शानदार गोलंदाजी
वूडने चार षटके गोलंदाजी करताना फक्त 2 धावा खर्च केल्या. यामधील 3 षटके निर्धाव होती. त्याने 13व्या षटकातील पाचव्या चेंडूवर उस्मान ख्वाजा याच्याविरुद्ध दोन धावा खर्च केल्या. त्यानंतर अखेरच्या चेंडूवर वूडने ख्वाजाचा त्रिफळा उडवत त्याला तंबूचा रस्ता दाखवला. वूडने ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात 11.4 षटके गोलंदाजी करताना 34 धावा खर्चून 5 विकेट्स घेतल्या. (fast bowler mark wood bowled fastest over in third ashes test against australia at leeds)
महत्वाच्या बातम्या-
तिसऱ्या कसोटीत घाबरला बेअरस्टो! क्रीझमध्येच थांबल्याचे पाहून ऑस्ट्रेलियन खेळाडूही लागले हसू, Video
Ashes 2023 । ‘ऑस्ट्रेलियन चाहते माझा तिरस्कार करतात…’, शतकानंतर समोर आल्या मार्शच्या वेदना