सध्या भारत विरूद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) संघात 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. त्यातील पहिला सामना रविवारी (6 ऑक्टोबर) रोजी खेळला गेला. या सामन्यात भारताने 7 गडी राखून दणदणीत विजय मिळवला आणि मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. तत्पूर्वी भारताचा युवा स्टार वेगवान गोलंदाज मयंक यादवने (Mayank Yadav) या सामन्यात पदार्पण केले होते. पदार्पण सामन्यातच त्याने धमाकेदार गोलंदाजीचे प्रदर्शन दाखवले. त्याने त्याच्या यशाचे श्रेय प्रशिक्षकाला दिले.
मयंत यादवने (Mayank Yadav) पहिले षटक मेडन टाकले होते. त्याने 4 षटकात 14 निर्धाव चेंडू टाकले आणि 21 धावांत एक विकेट घेतली. त्याने मॅच ब्रॉडकास्टर जिओ सिनेमाला त्याच्या पदार्पणाबद्दल सांगताना म्हणाला, “मी खूप उत्साही होतो पण खरे सांगायचे तर, मी थोडा घाबरलो होतो कारण दुखापतीतून सावरल्यानंतर सुमारे 3-4 महिन्यांनी मी पुनरागमन करत होतो, मला स्पर्धात्मक क्रिकेट खेळण्यात जास्त रस होता. मला संधी मिळत नव्हती आणि मग अचानक संधी मिळाली. मी आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण करत होतो, त्यामुळे थोडा नर्वस होतो.”
पुढे बोलताना मयंक म्हणाला, “माझा वेग नेहमीच माझ्या मनात असतो, पण माझ्या आयपीएल प्रवासादरम्यान मला कळले आहे की, या फॉरमॅटमध्ये आणि विशेषत: आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्य महत्त्वाचे आहे. लाईन आणि लेन्थ महत्त्वाची आहे, सातत्याने योग्य लाइन आणि लेन्थ बॉलिंग केल्याने खरोखर मदत होते. कारण त्यावेळी फलंदाज तुमचा आदर करू लागतात, मी माझी लाईन आणि लेन्थ अचूक ठेवण्यावर अधिक लक्ष देतो.”
मयंक म्हणाला की, “पदार्पणापूर्वी प्रशिक्षक गौतम गंभीरने (Gautam Gambhir) जास्त प्रयत्न टाळण्याचा सल्ला दिला होता. त्यांनी क्षमतांवर लक्ष केंद्रित करून सर्वोत्तम प्रयत्न करण्याचा सल्ला दिला होता.”
महत्त्वाच्या बातम्या-
“श्रेय फक्त रोहितलाच इतर कोणालाही नाही” गंभीरबद्दल काय म्हणाला ‘हा’ दिग्गज
कोहली, स्मिथ, विल्यमसन तर दूरच… जगातील कोणताच फलंदाज मोडू शकणार नाही, रोहितचे ‘वर्ल्ड रेकाॅर्ड’
महान क्रिकेटर होण्यापासून वंचित राहिला ‘हा’ खेळाडू, तरूण वयातच संपली कारकिर्द