लखनऊ सुपर जायंट्स संघाचा वेगवान गोलंदाज मोहसिन खान याने आयपीएल 2023 स्पर्धेच्या 63व्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध खतरनाक गोलंदाजी केली. यासह त्याने लखनऊ संघाला 5 धावांनी महत्त्वपूर्ण विजय मिळवून दिला. या विजयानंतर मोहसिनने त्याच्या आजारपणाचा उल्लेख करत म्हटले की, जर तो डॉक्टरांकडे वेळेवर गेला नसता, तर त्याचा हात कापावा लागला असता.
मुंबई इंडियन्स संघाला अटीतटीच्या सामन्यात विजयासाठी अखेरच्या षटकात 11 धावांची गरज होती. यावेळी खेळपट्टीवर टीम डेविड (Tim David) आणि कॅमरून ग्रीन (Cameron Green) यांसारख्या विस्फोटक फिनिशर होते. मात्र, मोहसिन खान (Mohsin Khan) याने शानदार गोलंदाजी करत संघाला यादगार विजय मिळवून दिला. या विजयासह लखनऊ संघ प्ले-ऑफमध्ये जागा पक्की करण्याच्या जवळ पोहोचला.
मोहिसनला मागील वर्षी खांद्याची सर्जरी करावी लागली होती. त्याच्या डाव्या खांद्यात रक्त गोठले होते. त्यामुळे त्याला सर्जरी करावी लागली होती. यामुळे तो घरच्या मैदानांवर खेळल्या जाणाऱ्या आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेतील सुरुवातीच्या सामन्यांना मुकला होता.
काय म्हणाला मोहसिन?
सामन्यानंतर मोहसिन म्हणाला की, “एक वेळ होती, जेव्हा मी क्रिकेट खेळण्याचा विचारच सोडला होता. कारण, माझा हात उचलतच नव्हता. खूप प्रयत्न करून मी कसाबसा हात उचलायचो, तेव्हा तो सरळही होत नव्हता. हा चिकित्सेशी संबंधित आजार होता. मी ती वेळ आठवून घाबरून जातो. कारण, डॉक्टर म्हणाले होते की, जर मी सर्जरीसाठी एक महिना जरी उशीर केला असता, तर माझा हातही कापावा लागला असता.”
या 24 वर्षीय वेगवान गोलंदाजाने पुढे बोलताना म्हटले की, “माझी इच्छा आहे की, कोणत्याही क्रिकेटपटूने आजारी पडू नये. हा विचित्र प्रकारचा आजार होता. माझ्या धमण्या पूर्णत: बंद पडल्या होत्या. यामध्ये रक्त गोठले होते. क्रिकेट संघ (उत्तर प्रदेश क्रिकेट संघ), राजीव शुक्ला सर, माझी फ्रँचायझी (लखनऊ सुपर जायंट्स), माझ्या कुटुंबाने मला या कठीण काळात खूप पाठिंबा दिला. सर्जरीपूर्वी आणि त्यानंतर मी खूपच कठीण काळ पाहिला, पण सर्वांनी माझी साथ दिली.”
अखेरच्या षटकांतील योजनेविषयी विचारले असता, तो म्हणाला की, “निश्चितच याचा दबाव असतो. मी मैदानात तेच करण्याचा प्रयत्न करत होतो, जे आम्ही सामान्यत: सरावादरम्यान करतो. मी 10 किंवा 11 धावांचा बचाव करण्याविषयी विचार करत नव्हतो. मी सहा चांगले चेंडू टाकण्याबाबत विचार करत होतो.”
मोहसिन खान याच्या स्पर्धेतील कामगिरीविषयी बोलायचं झालं, तर त्याने 3 सामन्यात 2 विकेट्स घेतल्या आहेत. त्यात त्याने 36 धावा खर्च केल्या आहेत. (fast bowler mohsin khan said he thought he might not be able to bowl again)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
धवनने नाणेफेकीत मारली बाजी! वॉर्नरच्या नेतृत्वातील दिल्ली करणार प्रथम फलंदाजी
अखेरच्या दोन सामन्यांमध्ये दिल्ली करणार राडा, संघाकडून आली ‘ही’ सर्वात मोठी प्रतिक्रिया






