---Advertisement---

वर्ल्डकपला 8 दिवस शिल्लक असताना न्यूझीलंडसाठी गुडन्यूज! दिग्गज खेळाडूला मिळाली भारतात येण्याची परवानगी

On: बुधवार, सप्टेंबर 27, 2023 12:30 PM
New-Zealand
---Advertisement---

अवघ्या 8 दिवसांवर येऊन ठेपलेल्या वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेपूर्वी न्यूझीलंड क्रिकेट संघाबाबत चांगली बातमी समोर येत आहे. संघाचा वेगवान गोलंदाजा टीम साऊदी याला दुखापतीनंतरही संघाशी जोडले जाण्याची परवानगी मिळाली आहे. टीम साऊदी आतापर्यंत पूर्णपणे फिट झाला नाहीये, पण तरीही त्याला संघात सामील होण्याची परवानगी मिळाली आहे. मात्र, त्याचा पर्याय म्हणून काईल जेमिसन यालाही भारतात पाठवले गेले आहे.

न्यूझीलंड संघाचा दिग्गज वेगवान गोलंदाज टीम साऊदी (Tim Southee) इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या वनडे सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षण करताना दुखापतग्रस्त झाला होता. इंग्लंड संघाच्या डावातील 14व्या षटकात जो रूट याचा झेल घेण्याचा प्रयत्न करताना साऊदी दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे त्याला मैदानातून बाहेर जावे लागले होते. तसेच, ट्रेंट बोल्ट याला त्याच्या जागी क्षेत्ररक्षण करावे लागले होते. त्याची दुखापत एवढी गंभीर होती की, तो फलंदाजीसाठीही आला नव्हता. साऊदीला त्याची सर्जरी करावी लागली होती.

काईल जेमिसन पर्याय म्हणून न्यूझीलंडच्या ताफ्यात
न्यूझीलंड क्रिकेट (New Zealand Cricket) बोर्डाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात सांगितले गेले की, काईल जेमिसन (Kyle Jamieson) याला पर्याय म्हणून विश्वचषकासाठी पाठवले आहे. मात्र, तो अधिकृत संघाचा भाग नसेल. त्यामुळे तो पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या दोन सराव सामन्यातही भाग घेऊ शकणार नाही.

https://twitter.com/BLACKCAPS/status/1706710243902738816

खरं तर, टीम साऊदी वनडे क्रिकेटमध्ये न्यूझीलंड संघाचा सर्वाधिक विकेट्स घेणारा तिसरा गोलंदाज आहे. त्याने आतापर्यंत 33.60च्या सरासरीने 214 विकेट्स घेतल्या आहेत. तो संघासाठी सर्वात अनुभवी वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. न्यूझीलंड संघाला आशा असेल की, तो पहिल्या सामन्यापूर्वी फिट होईल. कारण, न्यूझीलंड संघाला आपला पहिला सामना 5 ऑक्टोबर रोजी इंग्लंडविरुद्ध खेळायचा आहे. हा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. (fast bowler tim southee cleared to join new zealand squad for 2023 world cup)

वनडे विश्वचषकासाठी न्यूझीलंड संघ
केन विलियम्सन (कर्णधार), ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमन, डेवॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिचेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, ईश सोधी, टीम साऊदी, विल यंग.

हेही वाचा-
वर्ल्डकपपूर्वी अश्विनबाबत रोहित शर्माची सर्वात मोठी प्रतिक्रिया, वाचून क्रिकेटप्रेमींनाही होईल आनंद
जगातील बलाढ्य संघांना न जमलेला विक्रम नेपाळने केला, टी20 क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---