राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात आयपीएल २०२२मधील ६८वा सामना शुक्रवारी (दि. २० मे) पार पडला. मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडिअमवर रंगलेल्या या सामन्यात चेन्नईचा स्टार अष्टपैलू खेळाडू मोईन अली याने नुसता धुमाकूळ घातला. त्याने पॉवरप्लेमध्येच आपले अर्धशतक झळकावले. यासोबतच त्याने आपल्या नावावर खास विक्रमाची नोंदही केली. चेन्नईसाठी अशी कामगिरी करणारा तो दुसराच फलंदाज ठरला.
या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाचा कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) याने नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी चेन्नईकडून फलंदाजी करताना सलामीवीर ऋतुराज गायकवाड २ धावा करून पहिल्याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर तंबूत परतला. त्यामुळे फलंदाजीला मोईन अली (Moeen Ali) आला. अलीने विस्फोटक फलंदाजी करताना अवघ्या १९ चेंडूत अर्धशतक झळकावले.
Summa Surrunu! Second fastest 5️⃣0️⃣ in the history of the Super Kings! #RRvCSK #Yellove #WhistlePodu 💛🦁 pic.twitter.com/H7TrkLvCTK
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) May 20, 2022
या अर्धशतकासह तो चेन्नई सुपर किंग्स संघाकडून वेगवान अर्धशतक करणारा दुसरा खेळाडू ठरला. चेन्नईसाठी वेगवान अर्धशतक करणाऱ्या खेळाडूंमध्ये अव्वलस्थानी सुरेश रैना आहे. रैनाने आयपीएल २०१४मध्ये पंजाब किंग्सविरुद्ध १६ चेंडूत अर्धशतक झळकावले होते. त्यानंतर खुद्द एमएस धोनी आणि अंबाती रायुडू अनुक्रमे तिसऱ्या स्थानी आहेत. धोनीने आयपीएल २०१२मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध २० चेंडूत अर्धशतक केले होते. तसेच, रायुडूने आयपीएल २०२१मध्ये मुंबईविरुद्धच २० चेंडूत अर्धशतक ठोकले होते. यानंतर चौथ्या स्थानी सॅम बिलिंग्स आहे त्याने आयपीएल २०१८मध्ये कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध २१ चेंडूत अर्धशतक केले होते.
अलीने या सामन्यात ५७ चेंडूंचा सामना करत ९३ धावा करत संघाच्या धावसंख्येत मोलाची भर घातली. या धावा करताना त्याने ३ षटकार आणि १३ चौकार मारले.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून सर्वात वेगवान अर्धशतक करणारे खेळाडू
१६ चेंडू- सुरेश रैना (विरुद्ध पंजाब किंग्स, २०१४)
१९ चेंडू- मोईन अली (विरुद्ध राजस्थान रॉयल्स, २०२२)*
२० चेंडू- एमएस धोनी (विरुद्ध, मुंबई इंडियन्स, २०१२)
२० चेंडू- अंबाती रायुडू (विरुद्ध, मुंबई इंडियन्स, २०२१)
२१ चेंडू- सॅम बिलिंग्स (विरुद्ध, कोलकाता नाईट रायडर्स, २०१८)
आयपीएल इतिहासातील पहिला वाद म्हणजेच ‘स्लॅप-गेट’
वडिलोपार्जित घराला टाळा ठोकत गांगुली जाणार नव्या घरी, आलिशान बंगल्याची किंमत वाचून उडेल झोप