गुरुवारी (दि. १४ एप्रिल) राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघात आयपीएल २०२२चा २४वा सामना पार पडला. या सामन्यात गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करताना १९२ धावांचे भलेमोठे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानकडून जोस बटलरच्या नावावर खास विक्रमाची नोंद झाली. त्याने आयपीएलच्या १५व्या हंगामात वेगवान अर्धशतक ठोकण्याची कामगिरी केली.
या सामन्यात गुजरात संघाच्या आव्हानाचा पाठलाग करताना जोस बटलर राजस्थानकडून सलामीला उतरला होता. बटलरने यावेळी फक्त २३ चेंडूत ३ षटकार आणि ८ चौकारांच्या मदतीने ५४ धावा करत आपले अर्धशतक साजरे केले. बटलरने हे अर्धशतक पावरप्लेच्या शेवटच्या षटकातील पाचव्या चेंडूवर पूर्ण केले होते. यासह त्याने या हंगामातील तिसरे वेगवान अर्धशतक झळकावले.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
आयपीएलच्या १५व्या हंगामात सर्वात वेगवान अर्धशतक झळकावण्याचा विक्रम कोलकाता नाईट रायडर्सचा फलंदाज पॅट कमिन्सच्या नावावर आहे. कमिन्सने मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळताना अवघ्या १४ चेंडूत अर्धशतक झळकावले होते. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर पंजाब किंग्सचा लियाम लिविंगस्टोन आहे. त्याने गुजरात टायटन्सविरुद्ध खेळताना २१ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले होते. त्यानंतर संयुक्तरीत्या तिसऱ्या क्रमांकावर जोस बटलरसह एविन लुईस आहे. लुईसने चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध २३ चेंडूत वेगवान अर्धशतक केले होते. यानंतर राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन चौथ्या स्थानी असून त्याने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध २५ चेंडूत वेगवान अर्धशतक झळकावले होते.
Bossing it and how! @josbuttler brings up a quick-fire FIFTY off just 23 deliveries.
Live – https://t.co/yM9yMibDVf #RRvGT #TATAIPL pic.twitter.com/kC05o6hkrz
— IndianPremierLeague (@IPL) April 14, 2022
जोस बटलरची आयपीएल हंगामातील कामगिरी
बलटरने या हंगामात आतापर्यंत ५ सामने खेळले आहेत. या ५ सामन्यात त्याने ६८च्या सरासरीने आणि १५२.८१च्या स्ट्राईक रेटने २७२ धावा चोपल्या आहेत.
आयपीएल २०२२मध्ये वेगवान अर्धशतक करणारे खेळाडू
१४ चेंडू- पॅट कमिन्स (विरुद्ध मुंबई इंडियन्स)
२१ चेंडू- लियाम लिविंगस्टोन (विरुद्ध गुजरात टायटन्स)
२३ चेंडू- जोस बटलर (विरुद्ध गुजरात टायटन्स)*
२३ चेंडू- एविन लुईस (विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स)
२५ चेंडू- संजू सॅमसन (विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद)
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
एक तर एक, यादीत समावेश तर झाला! पाहा गुजरात टायटन्स संघाने असा कोणता कारनामा केलाय