Thursday, May 19, 2022
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

द बॉस! गुजरातच्या गोलंदाजांना चोपत जोस बटलरने केली शानदार कामगिरी; वॉर्नर अन् गेलच्या पंक्तीत मिळवले स्थान

द बॉस! गुजरातच्या गोलंदाजांना चोपत जोस बटलरने केली शानदार कामगिरी; वॉर्नर अन् गेलच्या पंक्तीत मिळवले स्थान

April 14, 2022
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
Jos-Buttler

Photo Courtesy: Twitter/IPL


यंदाच्या १५व्या आयपीएल हंगामात खेळाडू आपल्या वादळी खेळीचे दर्शन प्रेक्षकांना घडवत आहेत. यातील एक नाव म्हणजे राजस्थान रॉयल्सचा जोस बटलर. बटलर या हंगामात पहिल्या सामन्यापासून धावा चोपताना दिसतोय. अशात गुरुवारी (दि. १४ एप्रिल) हंगामातील  २४वा सामना राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स संघात खेळला गेला. नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमी येथे झालेल्या या सामन्यात बटलरने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीचा जलवा दाखवला. यामुळे त्याने खास कारनामा स्वत:च्या नावावर नोंदवला आहे.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना गुजरात (Gujarat Titans) संघाने निर्धारित २० षटकात ४ विकेट्स गमावत १९२ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानचा (Rajasthan Royals) सलामीवीर फलंदाज जोस बटलरने (Jos Buttler) खणखणीत अर्धशतक पूर्ण केले. त्याने अवघ्या २३ चेंडूत ३ षटकार आणि ८ चौकार चोपत ५४ धावा केल्या. विशेष म्हणजे, हे अर्धशतक त्याने पावरप्लेमधील शेवटच्या म्हणजेच सहाव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर पूर्ण केले.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

असा कारनामा करण्याची त्याची दुसरी वेळ होती. यासह त्याने आयपीएलमध्ये पावरप्लेमध्ये खेळताना ५० किंवा त्याहून अधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवले. आयपीएलमध्ये पावरप्लेमध्ये सर्वाधिक वेळा ५० किंवा त्याहून अधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये डेविड वॉर्नर अव्वल स्थानी आहे. त्याने आतापर्यंत ६ वेळा हा कारनामा केला आहे. तसेच, दुसऱ्या स्थानी ख्रिस गेल असून त्याने हा कारनामा ३ वेळा केला आहे. यानंतर केएल राहुल आणि सुनील नारायणसह बटलर संयुक्तरीत्या तिसऱ्या स्थानावर आहे. त्यांनी २ वेळा ही कामगिरी केली आहे.

जोस बटलरने या हंगामात ५ सामने खेळताना ६८च्या सरासरीने सर्वाधिक २७२ धावा केल्या आहेत. या धावा त्याने १५२.८१च्या स्ट्राईक रेटने चोपल्या आहेत.

आयपीएलमध्ये पावरप्लेमध्ये ५० किंवा त्याहून अधिक धावा करणारे फलंदाज
६ वेळा- डेविड वॉर्नर
३ वेळा- ख्रिस गेल
२ वेळा- जोस बटलर*
२ वेळा- केएल राहुल
२ वेळा- सुनील नारायण

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

पहिल्यांदाच कर्णधार बनलेल्या पंड्याने स्वत:ला केले सिद्ध! यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा चोपत बनला ‘टॉपर’

एक तर एक, यादीत समावेश तर झाला! पाहा गुजरात टायटन्स संघाने असा कोणता कारनामा केलाय

कशी जिंकणार मुंबई इंडियन्स? ८.२५ कोटीत संघात घेतलेल्या खेळाडूलाच बसवलंय बाकावर, माजी दिग्गजानेही खडसावलं


ADVERTISEMENT
Next Post
Jos-Buttler-Fifty

कौतुक करावं तेवढं कमीच! ३ षटकार अन् ८ चौकारांसह बटलरची वेगवान फिफ्टी, पटकावला 'हा' क्रमांक

Gujarat-Titans

राजस्थानच्या 'रॉयल्स'वर भारी पडले गुजरातचे 'टायटन्स', ३७ धावांनी विजय मिळवत गुणतालिकेत गाठले अव्वलस्थान

SRH-vs-KKR

IPL2022| हैदराबाद वि. कोलकाता सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!

Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.