---Advertisement---

INDvsSL :”रोहित भाईने रियानला जबरदस्ती सामना पाहायला बसवलंय”, पराग सोशल मीडियावर भयंकर ट्रोल

On: शुक्रवार, ऑगस्ट 2, 2024 7:11 PM
Riyan Parag
---Advertisement---

Riyan Parag Trolled :- शुक्रवारी (02 ऑगस्ट) श्रीलंकेविरुद्ध झालेल्या पहिल्या वनडे सामन्यातून भारतीय कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर या सिनियर खेळाडूंचे क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन झाले. मात्र हा सामना आणखी एका कारणामुळे चर्चेत राहिला. ते कारण आहे भारतीय युवा क्रिकेटपटू रियान पराग. रियानला या सामन्यादरम्यान बाकावर बसवण्यात आले, ज्यानंतर त्याला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. यामागचे कारण काय आहे,? जाणून घेऊया..

रियान परागची श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघात निवड झाली तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटले. कारण रियान परागने जास्त लिस्ट ए क्रिकेट खेळलेले नाही. मात्र, त्यावेळी सोशल मीडियावर अशी चर्चा होती की बीसीसीआयने त्याला जबरदस्तीने वनडे संघात ठेवले आहे, कारण त्याने भारतीय संघाचे सामने पाहावेत अशी बोर्डाची इच्छा होती. रियानच्या एका विधानाची बरीच चर्चा झाल्यामुळे हा दावा करण्यात आला होता. आता श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यादरम्यानच्या या विधानामुळे त्याला प्रचंड ट्रोल केले जात आहे.

खरे तर, जेव्हा भारतीय संघ टी20 विश्वचषक 2024 खेळत होता, त्यावेळी रियानला एका मुलाखतीत विचारण्यात आले होते, तू भारताचे सामने पाहतो का? यावर उत्तर देताना तो म्हणाला होता की, तो भारतीय संघाचा भाग नसल्यामुळे तो सामना पाहत नाही. रियानच्या या विधानावर प्रचंड टीका झाली होती. पण आता भारताच्या वनडे संघात निवड होऊनही त्याला बाकावर बसवण्यात आल्याने सोशल मीडियावर चाहत्यांनी त्याची मजा घ्यायला सुरुवात केली आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात तो डगआऊटमध्ये दिसल्याने चाहते त्याची खिल्ली उडवत आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले, “रियान म्हणाला होता की, ‘मी विश्वचषक पाहणार नाही’ म्हणून रोहितने त्याला श्रीलंकेविरुद्धचा द्विपक्षीय सामना दाखवण्याचा निर्णय घेतला,” तर दुसऱ्या व्यक्तीने लिहिले की, “दुर्मिळ प्रसंग, जेव्हा रियान क्रिकेट मॅचचा भाग नसतानाही सामना पाहत असतो.”

महत्त्वाच्या बातम्या-

“अरे माझ्याकडे काय बघतोय?”, श्रीलंकन फलंदाजाच्या विकेटवरुन गोंधळलेल्या रोहितची मजेशीर प्रतिक्रिया

आयपीएलवाला रूल है क्या! भारतीय खेळाडूंचा मजेशीर संवाद स्टंप माईकमध्ये कैद, व्हिडिओ व्हायरल

चाहत्यांचा हार्टब्रेक! स्टार बॅडमिंटनपटूच्या हाती निराशा, सलग तिसऱ्या ऑलिम्पिकमध्ये पदकाचे स्वप्न भंगले

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---