IND vs SL, First ODI :- भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात आर प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो येथे शुक्रवारी (02 ऑगस्ट) वनडे मालिकेतील पहिला सामना झाला. या सामन्यादरम्यान एक मजेशीर किस्सा घडला. यावेळी भारतीय खेळाडूंना आयपीएलच्या निमयाचीही आठवण झाली. भारतीय खेळाडूंमधील मजेशीर संवाद स्टंप माईकमध्ये कैद झाला असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
त्याचे झाले असे की, श्रीलंकेचा कर्णधार चरिथ असलंकाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेच्या डावातील 14 वे षटक टाकण्यासाठी शिवम दुबे आला होता. त्याच्या या षटकातील चौथा चेंडू श्रीलंकन फलंदाज निसांकाच्या थायपॅडला लागला. त्यामुळे दुबेने पंचांकडे पायचीतसाठी अपील केली. पायचीतसाठी रिव्ह्यु घ्यावा अशी दुबेची इच्छा होती. परंतु यष्टीरक्षक केएल राहुल दुबेच्या निर्णयाशी सहमत दिसला नाही. रोहित आणि राहुलमध्ये रिव्ह्यु घेण्यावरुन चर्चा झाली.
यादरम्यान पंचांनी वाइडचा निर्णय दिला. हे सर्व सुरू असताना भारतीय ताफ्यातू कुणीतरी म्हणाले, “आयपीएलवाला नियम आहे काय?” हा आवाज स्टंप माइकमध्ये कैद झाला असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मैदानावरील हा संवाद ऐकून समालोचकही त्यांचे हसू आवरू शकले नाहीत.
आयपीएलमध्ये पंचांनी वाइड दिल्यानंतरही खेळाडू त्यावर रिव्ह्यू घेऊ शकतात, असा नियम होता. याच नियमाची आठवण भारतीय खेळाडूंना श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडेत झाली. परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असा कोणताही नियम नाही.
@ProteinKohlii pic.twitter.com/9WRPtA3dTH
— , (@immkevinna) August 2, 2024
दरम्यान यजमान श्रीलंकेपुढे भारताविरुद्धची वनडे मालिका जिंकण्याचे आव्हान असेल. श्रीलंकेला यापूर्वीच्या टी20 मालिकेत 0-3 ने पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे या पराभवाचा वचपा काढत लाज वाचवण्यासाठी श्रीलंका वनडे मालिकेत प्रयत्नशील असेल. दुसरीकडे श्रीलंकेने जवळपास 27 वर्षांपूर्वी म्हणजे 1997 मध्ये भारताविरुद्ध शेवटची वनडे मालिका जिंकली होती. तेव्हापासून दोन्ही संघांमध्ये 10 वनडे मालिका झाल्या आहेत, मात्र प्रत्येक वेळी भारतीय संघाने विजय मिळवला आहे. श्रीलंकेला वनडे मालिकेत टीम इंडियाला पराभूत करता आलेले नाही.
हेही वाचा –
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये राडा! ट्रान्सजेंडर बॉक्सरनं महिला बॉक्सरला अवघ्या 46 सेकंदात दिला धोबीपछाड
चाहत्यांचा हार्टब्रेक! स्टार बॅडमिंटनपटूच्या हाती निराशा, सलग तिसऱ्या ऑलिम्पिकमध्ये पदकाचे स्वप्न भंगले
ऑलिम्पिक पदक जिंकताच स्वप्नील कुसाळेचं प्रोमोशन, मध्य रेल्वेत आता ऑफिसर म्हणून काम करणार!