---Advertisement---

मनू भाकर पदकांची हॅट्ट्रिक लगावणार! पॅरिस ऑलिम्पिकच्या आणखी एका फायनलमध्ये मारली धडक

On: शुक्रवार, ऑगस्ट 2, 2024 5:22 PM
---Advertisement---

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताची स्टार नेमबाज मनू भाकर हिनं महिलांच्या 25 मीटर पिस्तूल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. शुक्रवारी (2 ऑगस्ट) खेळल्या गेलेल्या पात्रता फेरीत तिनं दुसरं स्थान पटकावलं.

मनू भाकरनं प्रिसीजन राउंड मध्ये 294 आणि रॅपिड राउंड मध्ये 296 चा स्कोर केला. तिचा एकूण स्कोर 590 राहिला. पात्रता फेरीत हंगेरीची मेजर वेरोनिका प्रथम स्थानी राहिली. तिनं प्रिसीजन राउंड मध्ये 294 आणि रॅपिड राउंडमध्ये 298 गुण मिळवले. वेरोनिकाचा एकूण स्कोअर 592 होता.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनू भाकरनं सलग तिसऱ्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. याआधी तिनं महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल आणि सरबज्योत सिंगसोबत 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. या दोन्ही प्रकारात तिनं कांस्यपदक पटकावलं आहे. आता मनूला पदकांची हॅट्ट्रिक करण्याची संधी आहे.

मनू भाकर एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकणारी पहिली भारतीय आहे. ती उद्या म्हणजेच शनिवारी (3 ऑगस्ट) 25 मीटर पिस्तूल स्पर्धेची अंतिम फेरी खेळणार आहे. प्रिसीजन राउंडनंतर मनू तिसऱ्या स्थानावर होती. याच स्पर्धेत आणखी एक भारतीय नेमबाज ईशा सिंग 581 गुणांसह 18 व्या स्थानावर राहिली. तिनं प्रिसीजन राउंडमध्ये 291 गुण मिळवले. तर तिचा रॅपिड राउंडमध्ये स्कोर 290 एवढा होता.

हेही वाचा – 

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये राडा! ट्रान्सजेंडर बॉक्सरनं महिला बॉक्सरला अवघ्या 46 सेकंदात दिला धोबीपछाड
चाहत्यांचा हार्टब्रेक! स्टार बॅडमिंटनपटूच्या हाती निराशा, सलग तिसऱ्या ऑलिम्पिकमध्ये पदकाचे स्वप्न भंगले
ऑलिम्पिक पदक जिंकताच स्वप्नील कुसाळेचं प्रोमोशन, मध्य रेल्वेत आता ऑफिसर म्हणून काम करणार!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---