भारतीय संघाचा युवा विस्फोटक फलंदाज शुबमन गिल हा सध्या विक्रमांचे मनोरे रचताना दिसत आहे. नुकत्याच संपलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेचा शेवटही त्याने शतकानेही केला होता. आता न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेची सुरुवातही त्याने शतकानेच केली आहे. यासह त्याच्या नावावर खास विक्रमाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे, शुबमनने विराट कोहली, शिखर धवन यांसारख्या दिग्गज खेळाडूंनाही या विक्रमात मागे टाकले आहे. चला तर शुबमनच्या विक्रमाबद्दल जाणून घेऊया…
बुधवारी (दि. 18 जानेवारी) भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघातील पहिला वनडे सामना हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडिअमवर खेळला गेला. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. भारताकडून सलामीवीर फलंदाज शुबमन गिल याने 88 चेंडूत शतक झळकावले. शतक झळकावण्यासाठी त्याने 2 षटकार आणि 14 चौकारांचीही बरसात केली.
Live – https://t.co/DXx5mqRguU #INDvNZ @mastercardindia pic.twitter.com/rEmRg6BzJa
— BCCI (@BCCI) January 18, 2023
शुबमन गिलचा विक्रम
गिलने शतक ठोकल्यानंतर फटकेबाजी अशीच सुरू ठेवली. त्याने पुढे 1 धाव आणि आणखी 2 चौकार मारत 109 धावांवर पोहोचला. यासह त्याच्या नावावर खास विक्रम नोंदवला गेला. गिल भारताकडून वनडे क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 1000 धावा करणारा अव्वल क्रमांकाचा फलंदाज बनला. गिलने अवघ्या 19 वनडे डावात ही कामगिरी करून दाखवली. विशेष म्हणजे, जागतिक स्तरावर हा विक्रम पाकिस्तानच्या फखर जमान याच्या नावावर आहे. त्याने 18 चेंडूत वनडेत वेगवान 1000 धावा केल्या होत्या.
दुसरीकडे, भारतीय खेळाडूंबद्दल बोलायचं झालं, तर वनडेत वेगवान 1000 धावा करण्याच्या बाबतीत गिलने विराट कोहली, शिखर धवन यांसारख्या दिग्गजांना मागे टाकले आहे. विशेष म्हणजे, विराट आणि धवन या विक्रमाच्या यादीत संयुक्तरीत्या दुसऱ्या स्थानी आहेत. त्यांनी प्रत्येकी 24 डावांमध्ये वनडेत वेगवान 1000 धावा केल्या होत्या. त्यानंतर नवज्योत सिंग सिद्धू आणि श्रेयस अय्यर हे या यादीत संयुक्तरीत्या तिसऱ्या स्थानी आहेत. त्यांनी प्रत्येकी 25 डावात ही कामगिरी केली होती. (Fastest Indian to 1000 ODI runs shubman gill on top)
भारतीय संघाकडून वनडेत वेगवान 1000 धावा करणारे फलंदाज (डावानुसार)
19 डाव- शुबमन गिल*
24 डाव- विराट कोहली
24 डाव- शिखर धवन
25 डाव- नवज्योत सिंग सिद्धू
25 डाव- श्रेयस अय्यर
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रोहित भाऊंचा विषयच खोल! पॉवरप्लेमध्ये 2 षटकार ठोकत मोडला धोनीचा विक्रम, बनलाय टेबल टॉपर
टॉसचा निकाल भारताच्या पारड्यात! दोन धुरंधरांचे पुनरागमन, तर ईशानचाही ताफ्यात समावेश