सिडनी। आजपासून भारताचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध चौथा आणि शेवटचा कसोटी सामना सुरु झाला आहे. हा सामना सिडनी क्रिकेट ग्राउंडवर सुरु आहे. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या दिवसाखेर पहिल्या डावात 4 बाद 303 धावा केल्या आहेत.
या डावात भारताकडून चेतेश्वर पुजाराने शतकी खेळी केली आहे. तो पहिल्या दिवसाखेर 250 चेंडूत 130 धावांवर नाबाद आहे. त्याने 199 चेंडूत त्याचे हे शतक पूर्ण केले आहे.
पुजाराचे हे शतक त्याच्या कसोटी कारकिर्दीतील 18 वे शतक ठरले आहे. तसेच पुजाराने आज केलेले हे शतक ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या या कसोटी मालिकेतील त्याचे तिसरे शतक आहे. याबरोबरच त्याने अनेक विक्रमांनाही गवसणी घातली आहे.
तो कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 18 शतके करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आला आहे. पुजाराने त्याचे हे 18 वे कसोटी शतक त्याच्या कसोटी कारकिर्दीतील 114 व्या डावात पूर्ण केले आहे. या बरोबरच त्याने मोहम्मद अझरुद्दीन यांच्या विक्रमाला मागे टाकले आहे. अझरुद्दीन यांनी 121 व्या डावात 18 वे कसोटी शतक केले होते.
सर्वात जलद 18 कसोटी शतके करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत अव्वल क्रमांकावर भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर आहेत. त्यांनी 82 डावात 18 कसोटी शतके पूर्ण केली होती.
सर्वात जलद 18 कसोटी शतके करणारे भारतीय फलंदाज (डावानुसार) –
82 डाव – सुनील गावसकर
99 डाव – सचिन तेंडुलकर
103 डाव – विराट कोहली
114 डाव – चेतेश्वर पुजारा
121 डाव – मोहम्मद अझरुद्दीन
महत्त्वाच्या बातम्या:
–विराट- पुजारामध्ये घडून आला दशकातील सर्वात बाप योगायोग
–या कारणामुळे टीम इंडिया १०० टक्के जिंकणार सिडनी कसोटी
–बॅटवर स्टिकर, बाॅडीवर टॅटू नसलेला मयांक अगरवाल राहुल- विजयला सरस