---Advertisement---

जे ना जमले कुणाला, ते जमले कॅप्टन कोहलीला

On: बुधवार, जानेवारी 8, 2020 8:29 AM
---Advertisement---

इंदोर। काल(7 जानेवारी) भारत विरुद्ध श्रीलंका संघात दुसरा टी20 सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने 7 विकेट्सने विजय मिळवला आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने एक खास विश्वविक्रम केला आहे.

त्याने या सामन्यात 17 चेंडूत 1 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 30 धावा केल्या. याबरोबरच त्याने आंतरराष्ट्रीय टी20मध्ये कर्णधार म्हणून 1000 धावा पूर्ण करण्याचाही टप्पा पार केला. हा टप्पा पार करणारा तो जगातील एकूण 6 वा तर भारताचा एमएस धोनी नंतरचा दुसराच कर्णधार ठरला.

त्याच्या आता आंतरराष्ट्रीय टी20मध्ये कर्णधार म्हणून 32 सामन्यातील 30 डावात 47.90च्या सरासरीने 1006 धावा झाल्या आहेत. त्याचमुळे तो आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वात जलद 1000 धावा पूर्ण करणारा कर्णधार ठरला आहे.

याआधी हा विक्रम दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डूप्लेसिसच्या नावावर होता. डूप्लेसिसने आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 31 डावात कर्णधार म्हणून 1000 धावा पूर्ण केल्या होत्या. विराटने 30 डावात हा टप्पा गाठला आहे.

#आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये कर्णधार म्हणून सर्वात जलद 1000 धावा करणारे क्रिकेटपटू – 

30 डाव – विराट कोहली

31 डाव – फाफ डू प्लेसिस

36 डाव – केन विलियम्सन

42 डाव – ओएन मॉर्गन

54 डाव – विल्यम पॉर्टरफिल्ड

57 डाव – एमएस धोनी

#आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वाधिक धावा करणारे कर्णधार – 

1273 धावा – फाफ डू प्लेसिस

1112 धावा – एमएस धोनी

1083 धावा – केन विलियम्सन

1013 धावा – ओएन मॉर्गन

1006 धावा – विराट कोहली

1002 धावा – विल्यम पॉर्टरफिल्ड

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---