रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि राजस्थान रॉयल्स संघात मंगळवारी (२६ एप्रिल) आयपीएल २०२२चा ३९वा सामना पार पडला. पुण्याच्या एमसीए स्टेडिअमवर पार पडलेल्या या सामन्यात राजस्थान संघाचा कर्णधार संजू सॅमसनने खास कामगिरी केली. विशेष म्हणजे, ही कामगिरी करत त्याने यादीत अव्वल क्रमांक पटकावला आणि सुरेश रैना, रोहित शर्मा तसेच विराटलाही मागे टाकले. (Sanju Samson Hit Fastest 150 Sixes In IPL Among Indians)
या सामन्यात बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने (Faf Du Plessis) नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. यावेळी राजस्थान (Rajasthan Royals) संघ फलंदाजी करण्यासाठी उतरला होता. राजस्थानने यावेळी ८ विकेट्स गमावत १४४ धावांचा डोंगर उभा केला. यावेळी फलंदाजी करताना संजू सॅमसनने (Sanju Samson) २१ चेंडूत २७ धावांची छोटेखानी खेळी केली. या धावा करताना त्याने १ चौकार आणि ३ षटकार मारले. या ३ षटकारांमुळे संजूच्या नावावर एक खास विक्रम रचला गेला. संजू आयपीएलमध्ये सर्वात वेगवान १५० षटकार मारणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये अव्वलस्थानी पोहोचला आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
आयपीएलमध्ये सर्वात वेगवान १५० षटकार मारणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये संजू अव्वलस्थानी असून त्याने एकूण १२५ डावांमध्ये ही कामगिरी पूर्ण केली आहे. या यादीत दुसऱ्या स्थानी ‘मिस्टर आयपीएल’ म्हणून ओळखला जाणारा सुरेश रैना (Suresh Raina) आहे. रैनाने १२८ डावांमध्ये हे यश मिळवले. दुसरीकडे, तिसऱ्या स्थानी रोहित शर्मा (Rohit Sharma) आहे. रोहितने १२९ डावांमध्ये सर्वात वेगवान १५० षटकार मारले होते. त्यानंतर चौथ्या स्थानी विराट कोहली (Virat Kohli) आहे. विराटने १३२ डावांमध्ये वेगवान १५० षटकार मारले होते.
आयपीएलमध्ये सर्वात वेगवान १५० षटकार मारणारे भारतीय फलंदाज
१२५ डाव- संजू सॅमसन*
१२८ डाव- सुरेश रैना
१२९ डाव- रोहित शर्मा
१३२ डाव- विराट कोहली
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
RCB vs RR। विराट कोहलीविषयी मोठी अपडेट, आरसीबीच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये महत्वाचा बदल
आता धीराने नाही, तर जोमाणे करावे लागेल काम; चेन्नईच्या फलंदाजांकडून चाहत्यांना आक्रमक खेळीची अपेक्षा
हार पत्करायला तयार नाही गुजरात टायटन्स; शमीने उचलला सर्वाधिक विकेट घेण्याचा विडा
चेन्नईच्या पराभवाला ‘ही’ ३ कारणे जबाबदार; कर्णधारानेच केली घोडचूक