आयपीएल २०२२चा जवळपास अर्धा प्रवास आता संपलाय. रविवारपर्यंत साखळी फेरीतील ३७ सामने झाले आहेत. यावेळी दोन नवीन संघ अर्थात लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्सने आयपीएलमध्ये पदार्पण केला आहे. आतापर्यंत दोन्हीही संघांची कामगिरी अतिशय चांगली राहिली आहे. आकड्यांबाबत बोलायचं झालं, तर गुजरात टायटन्स, राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स हैदराबाद हे मजबूत संघ असल्याचे सिद्ध झाले आहे. तिन्ही संघ सध्या पॉइंट्स टेबलमध्ये टॉप-३ मध्ये आहेत. यांच्या यशाचे रहस्य यांचा पॉवर-प्ले म्हणजेच पहिल्या ६ ओव्हरचा खेळ आहे. या काळात टायटन्सची गोलंदाजी सरासरी बाकी संघांच्या तुलनेत खूपच चांगली आहे.
गुजरात टायटन्सच्या या एकतर्फी विजयाचे श्रेय जाते त्याच्या जोरदार संघाला जाते. हा संघ उत्कृष्ट सामना खेळण्यासह सतत जिंकण्यात अजिबात कसली कसर सोडत नाहीये. पॉवर-प्लेमध्ये सर्वात जास्त म्हणजे १७ विकेट्स घेणारा, टीम गुजरात टायटन्सच्या मजबूत खेळाडूंपैकी एक आहे गोलंदाज मोहम्मद शमी. याने आतापर्यंत १० विकेट्स घेतले आहेत. तो आपल्या शरीराला लवचीकपणे फिट करत कुठल्याही परिस्थितीशी जुळवून घेऊ शकतो. उत्कृष्ट खेळ करण्यासाठी तो प्रत्येक दिवशी विशेष व्यायाम करतो. याचे व्हिडिओ तो स्वदेशी सोशल मीडिया मंच ‘कू’ ऍपच्या आपल्या हॅंडलवर टाकत असतो.
या व्हिडिओमध्ये शमी सिंगल लेग वर्क करताना दिसत आहेत. मोहम्मद शमीने हंगामाच्या आपल्या पहिल्या सामन्यातच लखनऊ सुपरजायंट्सच्या विरुद्ध ४ षटकांमध्ये २५ धावा देऊन ३ विकेट्स घेतल्या होत्या. शमीने पॉवर-प्लेमध्ये लखनऊच्या तीन फलंदाजांना माघारी पाठवले होते. शमीने आतापर्यंत आयपीएलमध्ये ७८ सामने खेळले, ज्यात त्याने ८.६च्या इकॉनॉमी रेटने ८२ विकेट्स घेतल्या आहेत.
आयपीएलच्या या हंगामामध्ये जर कुठल्या संघाने प्रेक्षकांना सर्वात जास्त चकीत केलं असेल, तर ती गुजरात टायटन्सच आहे. लिलावानंतर म्हणलं जात होतं की, हार्दिक पंड्याच्या संघामध्ये फलंदाजांची कमतरता आहे. मात्र, गुजरातने या चर्चांवर पूर्णविराम लावला होता. त्यांनी सातपैकी सहा मॅच जिंकल्या. हा संघ १२ अंकांसह टेबल पॉइंट्समध्ये टॉपवर आहे. या संघाला एकमात्र पराभव सनरायजर्स हैदराबादच्या विरुद्ध पत्करावा लागला.
दिसला कमाल योगायोग
टायटन्स आयपीएलमध्ये गुजरातचा दुसरा संघ आहे. याआधी २०१६ आणि २०१७मध्ये गुजरात लायन्सने स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता. हा केवळ योगायोग आहे, गुजरात लायन्सच्या संघानेसुद्धा आपल्या पहिल्या हंगामामध्ये सातपैकी सहा मॅच जिंकल्या होत्या. त्यांनाही सनरायजर्स हैदराबादच्या विरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. योगायोगाने दोन्ही संघांसाठी तो हंगामातील चौथाच सामना होता.
पॉवर-प्लेमध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाजीची सरासरी
पॉवर-प्लेमध्ये सर्वात चांगली गोलंदाजी सरासरी (१७.५) गुजरात टायटन्सची आहे. म्हणजे गुजरातचे गोलंदाज पॉवर-प्लेमध्ये प्रत्येक १७व्या चेंडूवर विकेट घेत आहेत. गुजरातचा नेट रनरेट +०.३९६ आहे. गुजरातला अजून सात सामने खेळायचे आहेत. यातून संघ जर तीन सामने अजून जिंकला, तर प्लेऑफमध्ये त्या संघाचे स्थान पक्के होईल. एक किंवा दोन विजयांनंतरही स्थिती त्याच संघासाठी अनुकूल राहील. मात्र, दुसऱ्या संघाच्या कामगिरीवर अवलंबून राहावे लागेल.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारत-दक्षिण आफ्रिका टी२० मालिकेसाठी नसणार बायो-बबल? या खेळाडूंना विश्रांती मिळण्याचीही शक्यता
रवी शास्त्रींचा धक्कादायक खुलासा! म्हणाले, ‘भारतातील जळणाऱ्या लोकांना वाटायचं की, मी…’
खरंच भाऊ-भाऊ आहेत का ऋषी अन् शिखर धवन? वाचा काय आहे नेमकं त्यांचं नातं