---Advertisement---

कर्णधार कोहलीने केले खास अर्धशतक, दिग्गज विव रिचर्ड्स यांनाही टाकले मागे

---Advertisement---

साउथँम्पटन। 2019 क्रिकेट विश्वचषकात बुधवारी(5 जून) आठवा सामना भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात रोज बॉल स्टेडीयमवर पार पडला. या सामन्यात भारताने 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. या विजयाबरोबरच भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या नावावर एक खास विक्रम झाला आहे.

कोहलीच्या नेतृत्वाखालील हा भारताचा 50 वा वनडे विजय ठरला आहे. त्यामुळे तो कर्णधार म्हणून सर्वात जलद 50 वनडे विजय मिळवण्याच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. त्याने आत्तापर्यंत भारताचे नेतृत्व करताना 69 वनडे सामन्यात नेतृत्व केले आहे.

याबरोबरच त्याने माजी महान क्रिकेटपटू विव रिचर्ड्स यांच्या विक्रमाला मागे टाकले आहे. रिचर्ड्स यांनी कर्णधार म्हणून 70 वनडे सामन्यांनंतर 50 विजय मिळवले होते.

विराटने कर्णधार म्हणून 69 सामन्यांपैकी 50 सामन्यात विजय मिळवला असून 17 सामन्यात पराभव स्विकारला आहे. तसेच 1 सामना बरोबरीत सुटला आहे तर 1 सामना अनिर्णित राहिला आहे.

वनडेमध्ये सर्वात जलद 50 विजय मिळवणाऱ्या कर्णधारांमध्ये विंडीजचे माजी दिग्गज कर्णधार क्वाईव्ह लॉइड आणि ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज कर्णधार रिकी पाँटिंग संयुक्तरित्या अव्वल स्थानावर आहेत. त्यांनी कर्णधार म्हणून त्यांच्या पहिल्या 63 वनडे सामन्यात 50 विजय मिळवले होते.

तसेच या यादीत दुसऱ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार हॅन्सी क्रोनिए आहे. त्यांनी कर्णधार म्हणून 69 वनडे सामन्यांनंतर 50 विजय मिळवले होते.

कोहली 50 वनडे विजय मिळवणारा चौथा भारतीय कर्णधार –

कोहली भारतीय कर्णधार म्हणून 50 किंवा त्यापेक्षा अधिक वनडे विजय मिळवणारा चौथा कर्णधार ठरला आहे.  याआधी एमएस धोनी, मोहम्मद अझरुद्दीन आणि सौरव गांगुलीने 50 पेक्षा अधिक वनडे सामन्यात कर्णधार म्हणून विजय मिळवले आहेत.

आत्तापर्यंत भारताने सर्वाधिक वनडे विजय धोनीच्या नेतृत्वाखाली मिळवले आहेत. धोनीने भारताचे 200 वनडे सामन्यात नेतृत्व केले आहे. त्यातील 110 सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. या यादीत कोहली चौथ्या क्रमांकावर आहे.

#सर्वात जलद 50 वनडे विजय मिळवणारे कर्णधार – 

63 सामने – क्वाइव्ह लॉइड / रिकी पाँटिंग

68 सामने  – हॅन्सी क्रोनिए

69 सामने – विराट कोहली

70 सामने – विव रिचर्ड्स

#वनडेमध्ये सर्वाधिक विजय मिळवणारे भारतीय कर्णधार –

110 विजय – एमएस धोनी (200 सामने)

90 विजय – मोहम्मद अझरुद्दीन (174 सामने)

76 विजय – सौरव गांगुली (146 सामने)

50 विजय – विराट कोहली (69 सामने)

42 विजय – राहुल द्रविड (79 सामने)

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडीबातम्यासदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या – 

टॉप ५: हिटमॅन रोहित शर्माने शतकी खेळीबरोबरच केले हे खास ५ विक्रम

विश्वचषकाच्या पदार्पणातच युजवेंद्र चहलचा झाला या दिग्गजांच्या यादीत समावेश

विश्वचषक २०१९: एमएस धोनीने यष्टीरक्षकांच्या या खास यादीत ब्रेंडन मॅक्यूलमला टाकले मागे

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment