प्रो कबड्डी लीगचा ९वा हंगाम सुरू होणार आहे. यासाठी सध्या लीलाव प्रक्रिया सुरू आहे. यावेळी लीलावातील पहिलाच खेळाडू मोहम्मद नबीबक्ष याला तब्बल ८७ लाख रुपयांत पुणेरी पलटन संघाने विकत घेत जोरदार सुरुवात केलली. त्यानंतर पुढे आलेल्या फझल अत्राचली वर बोली लावण्यास जोरदार सुरुवात झाली. शेवटी पुणेरी पलटन संघाने त्याच्यावर तब्बल १ कोटी ३८ लाख रुपयांची बोली लावली. आणि फझल पीकेएलच्या ९व्या हंगामातील पहिला कोट्याधीश ठरला.
https://twitter.com/PuneriPaltan/status/1555557107126398977
शिवाय आजवरच्या प्रो कबड्डी लीगच्या इतिहासातील तिसरा सर्वात महागडा खेललाडू ठरला आहे. या यादीत पहिल्या क्रमांकावर १ कोटी ६५ लाखांसह प्रदीप नरवाल पहिल्या, तर १ कोटी ५१ लाखांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर फझललच्या पाठोपाठ महाराष्ट्राचा सिद्धार्थ देसाई १ कोटी ३० लाखांसह चौथ्या क्रमांकावर घसरलला आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
पीकेएल ऑक्शनचे बंपर ओपनिंग, पहिल्याच खेळाडूच्या खिशात तब्बल ‘इतके लाख’
नवदिप सैनी काऊंटी क्रिकेटमध्ये जाऊन करतोय गोलंदाजांची धुलाई, पाहा व्हिडिओ
अश्विन टी२० वर्ल्डकप खेळणार का? भारतीय दिग्गजाने दिले जरा स्पष्टच उत्तर






