---Advertisement---

जरा इकडे पाहा! आठ गोलांनंतरही गोवा अन् केरलामधील सामना सुटला बरोबरीत

On: रविवार, मार्च 6, 2022 11:41 PM
FC-Goa-vs-Kerala-Blasters
---Advertisement---

गोवा: हिरो इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) आठव्या हंगामातील शेवटच्या साखळी सामन्यात रविवारी तब्बल आठ गोलांची नोंद झाली. त्यानंतरही एफसी गोवा आणि केरला ब्लास्टर्स यांच्यातील लढत ४-४ अशी बरोबरीत सुटली. संडे स्पेशल सामना चांगलाच रंगला. २५व्या मिनिटाला २-० अशी आघाडी घेणारा केरला संघ खेळ संपायला दोन मिनिटे शिल्लक असताना २-४ असा पिछाडीवर होता. मात्र, व्हिन्सी बॅरेटो (८८व्या मिनिटाला) आणि अल्वॅरो वॅकेझने (९०व्या मिनिटाला) अप्रतिम गोल करताना केरला ब्लास्टर्सला पराभवापासून रोखले. त्यापूर्वी, जॉर्ज परेरा डियाझने दहाव्या आणि २५व्या मिनिटाला गोल केल्याने केरलाकडे मोठी आघाडी होती. त्याचा दुसरा गोल हा पेनल्टी स्वरूपातील आहे.

आधीच्या कामगिरीवर कुठल्याही संघाचे यशापयश ठरवता येत नाही, याचा प्रत्यय गुणतालिकेत चौथ्या स्थानी असलेल्या केरला ब्लास्टर्सना रविवारी आला. मध्यंतराला ०-२ अशा पिछाडीवर असूनही एफसी गोवाने जिगरबाज खेळ केला. उत्तरार्धात त्यांनी चारही गोल केले. अयराम कॅब्रेराने ४९व्या मिनिटाला गोवाचे खाते उघडले. त्यानंतर ६३व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीचे गोलामध्ये रूपांतर करताना संघाला २-२ अशी बरोबरी गाठून दिली.

https://twitter.com/FCGoaOfficial/status/1500504905236111365

सामना बरोबरीकडे झुकणार, असे वाटत असताना एफसी गोवाकडून तीन मिनिटांच्या फरकाने गोल झाले. ७९व्या मिनिटाला डॉहलिंगने क्लबचा तिसरा गोल केला. त्यानंतर ८२व्या मिनिटाला कॅब्रेरा मदतीला धावून आला. त्याचा हा वैयक्तिक तिसरा गोल ठरला.

शेवटच्या साखळी सामन्यात बरोबरीत समाधान मानावे लागले तरी केरला ब्लास्टर्सनी २० सामन्यांत ३४ गुण मिळवत प्ले ऑफ फेरीवर शिक्कामोर्तब केले. जमशेदपूर एफसी, एटीके मोहन बागान आणि हैदराबाद एफसी पाठोपाठ तेही सेमीफायनलसाठी पात्र ठरलेत. एफसी गोवाने सलग चौथा पराभव टाळताना हंगामाची सांगता बरोबरीने केली. २० सामन्यांत त्यांना १६ गुण मिळवता आल्याने ते नवव्या स्थानी स्थिरावले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

गतविजेत्या मुंबई सिटीचे आव्हान संपुष्टात, हैदराबादच्या विजयाने केरला ब्लास्टर्स उपांत्य फेरीत

आयएसएल: माजी विजेत्या बंगलोर एफसीचा विजयी निरोप, सुनील छेत्रीचा निर्णायक गोल

केरला ब्लास्टर्सचे लक्ष्य सेमीफायनल निश्चितीचे; गोव्याशी गाठ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---