Saturday, January 28, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एफसी गोवा घरच्या मैदानाचा फायदा उचलणार, हैदराबादला टक्कर देणार

एफसी गोवा घरच्या मैदानाचा फायदा उचलणार, हैदराबादला टक्कर देणार

January 5, 2023
in टॉप बातम्या, फुटबॉल
FC Goa

Photo Courtesy: Twitter/ FC Goa


हिरो इंडियन सुपर लीग 2022-23 (आयएसएल) च्या मॅचविक 14ची सुरुवात एफसी गोवा विरुद्ध हैदराबाद एफसी या दोन तगड्या संघांच्या सामन्याने होईल. गुरूवारी (5 जानेवारी) एफसी गोवा घरच्या मैदानाचा फायदा उचलताना गतविजेत्या हैदराबाद एफसीवर विजय मिळवण्याचा निर्धाराने मैदानावर उतरणार आहे. दुसरीकडे हैदराबाद एफसीचा संघ 28 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि मुंबई सिटी एफसी 30 गुणांसह अव्वल आहे. एफसी गोवा 19 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.

हैदराबाद एफसीचा आक्रमणात मागील पर्वात दमदार रेकॉर्ड आहे आणि त्यांनी त्या पर्वात 43 गोल केले होते. पण, यंदा त्यांची गोलसंख्या सध्यातरी 24 वर अडकली आहे. त्यांना अपेक्षित सरासरीने गोल करता आलेले नाहीत. पण, त्यांचा बजाव उल्लेखनीय झालेला आहे. त्यांनी 12 सामन्यांत केवळ 7 गोल होऊ दिले आहेत. यंदाच्या पर्वातील बचावातील ही सर्वोत्तम कामगिरी आहे.

हिरो आयएसएल इतिहासातील सर्वाधिक गोल नावावर असलेल्या बार्थोलोमेव ऑग्बेचेला मागील पर्वाप्रमाणे यंदा सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही. त्याने आतापर्यंत केवळ तीन गोल केले आहेत. झेव्हियर सिव्हेरियोने सर्वाधिक 4 गोल केले आहेत, तर हालिचरन नार्झरी व मोहम्मद यासीर यांनी मिळून सात गोलसाठी सहाय्य केले आहे.

एफसी गोवाविरुद्धच्या मागील सामन्यात हैदराबादने विजय मिळवला होता आणि मुख्य प्रशिक्षक मॅनोलो मार्क्यूझ यांना त्यापेक्षा अधिक चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. ते म्हणाले,”आम्हाला चांगल्या संघाविरुद्ध खेळायचे आहे, याची आम्हाला जाण आहे. जय पराजय किंवा अनिर्णित यापैकी कोणताही निकाल लागू शकतो, परंतु आम्हाला किमान सामन्यात दमदार कामगिरी करून दाखवायची आहे.”

दुसरीकडे एफसी गोवाला मागील दोन सामन्यांत विजय मिळवता आलेला नाही. जमशेदपूर एफसीविरुद्धचा सामना लेट गोलमुळे 2-2 असा बरोबरीत सुटला, तर एटीके मोहन बागानने 2-1 असा पराभवाचा झटका एफसी गोवाला दिला. या दोन्ही सामन्यांपैकी एकही विजय त्यांच्यासाठी महत्त्वाचा ठरला असता. एफसी गोवा व ओडिशा एफसी यांच्या खात्यात प्रत्येकी 19 गुण आहेत, परंतु गोल फरकामुळे गोवा पाचव्या स्थानावर आहे.

इकर गौराओत्स्केना व नोहा सदौही यांनी या पर्वात प्रत्येकी पाच गोल करून प्रभावी कामगिरी केली आहे. अलव्हारो व्हॅजकेझने आतापर्यंत एकच गोल केला आहे. एफसी गोवाने चेंडूवर ताबा राखण्यात यश मिळवले आहे, परंतु त्याचे गोलमध्ये रुपांतर करण्यात ते कुठेतरी कमी पडत आहेत.

Thursday can't come any sooner. Let's do UZZO, 𝘁𝗼𝗴𝗲𝘁𝗵𝗲𝗿 🧡

Get your match tickets now at https://t.co/lF9HmZJF7S #ForcaGoa #UzzoOnceAgain #FCGHFC pic.twitter.com/5T8sKyPeum

— FC Goa (@FCGoaOfficial) January 3, 2023

पण, मुख्य प्रशिक्षक कार्लोस पेना यांना संघाच्या असातत्यपूर्ण  खेळाची चिंता नाही. ते म्हणाले, आपण कुठून आलोय, याचा विचार करायला हवा. मागील पर्वात संघाला नवव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. अशा परिस्थितीतून विजयी मानसिकता तयार करणे आव्हानात्मक आहे. यंदाच्या पर्वाच्या सुरुवातीपासून आम्ही खेळात बरीच सुधारणा केली आहे.

एफसी  गोवा आणि हैदराबाद एफसी यांच्यात आतापर्यंत 7 सामने झाले आहेत. एफसी गोवाने 3 विजय मिळवले असून दोनमध्ये पराभव झाले आहेत व दोन अनिर्णित निकाल लागले आहेत.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पहिल्या वनडेला बावन्न वर्षे पूर्ण! वाचा ‘त्या’ ऐतिहासिक सामन्याबाबत काही रंजक गोष्टी
वाढदिवस विशेष: परदेशात भारतीय संघाला पहिली कसोटी मालिका जिंकून देणारा कर्णधार


Next Post
Ravi-Shastri

जेव्हा रवी शास्त्रींनी सिडनीत 9 तास फलंदाजी करत साकारली होती द्विशतकी खेळी, पाहा व्हिडिओ

Hardik Pandya & Shivam mavi

पुण्यातही भारत-श्रीलंका यांच्यात पाहायला मिळणार काट्याची टक्कर! मागील सामन्यांचे निकालच धक्कादायक

Usman Khawaja

सिडनीमध्ये कसोटीत लागोपाठ तीन शतके करणारा ख्वाजा केवळ चौथाच खेळाडू, यादीत एका भारतीयाचाही समावेश

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143