पुणे | राजेश वाधवान समूह आणि बॉलिवूड स्टार अर्जुन कपूर यांच्या सहमालकीच्या इंडियन सुपर लीग टीम असलेल्या एफसी पुणे सिटी संघाने अनुभवी फॉरवर्ड रॉबिन सिंग याचा 2018-19 या मौसमासाठी संघात समावेश केला आहे.
गत मौसमात एटीकेकडून खेळणारा, तसेच दिल्ली डायनामोजचा त्याचा माजी सहकारी मार्सिलिन्होसह 28 वर्षीय स्ट्रायकर रॉबिन सिंग आता एफसी पुणे सिटी संघाकडून खेळणार आहे.
एफसी पुणे सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव मोडवेल म्हणाले कि, रॉबिन हा उच्च स्तरावरील फुटबॉल क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव असलेला खेळाडू आहे. त्याच्या संघातील समावेशाने संघाची आघाडीची फळी अधिक भक्कम होणार असून हि आमच्यासाठी जमेची बाजू ठरणार आहे.
टाटा फुटबॉल अकादमीचा खेळाडू असलेल्या रॉबिन याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात 2010मध्ये कोलकत्ता संघाच्या वरिष्ठ संघात ईस्ट बंगालविरुद्धच्या सामन्याने केली. आपला प्रगतीचा आलेख चढता राखत त्याने बंगळूरु एफसी(2013-15), दिल्ली डायनामोज(2016-17) एफसी गोवा((2016-17) आणि एटीके(2017-
यावेळी संघात सहभागी झाल्यानंतर रॉबिन म्हणाला की, हा संघ अतिशय गुणवान खेळाडूंचा संघ असून यामध्ये युवा व अनुभवी अशा दोन्ही खेळाडूंचा उत्तम समतोल आहे. त्यामुळे पिचवर अथवा बाहेर विजेतेपद मिळविण्याची संपूर्ण संघाची मानसिकता दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–माजी विश्वविजेत्या जर्मनीचा फुटबॉलपटू ठरला वंशभेदाचा शिकार, आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून घेतली निवृत्ती
–स्म्रीती मानधनाचे किया सुपर लीगमध्ये धमाकेदार आगमन