भारत विरुद्ध श्रीलंका (INDvSL)यांच्यात टी20 मालिका सुरू आहे. यातील शेवटचा सामना शनिवारी (7 जानेवारी) राजकोटमध्ये खेळला जाणार आहे. या मालिकेतनंतर तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे. टी20 मालिकेसाठी नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma)याला विश्रांती दिली होती, तर तो आता वनडे मालिकेत परतत असून पुन्हा एकदा संघाचे नेतृत्व करणार आहे. यासाठी त्याने त्याच्या फिटनेसकडे अधिक लक्ष देत जीममध्ये घाम गाळला आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) नुकतेच यो-यो टेस्ट (Yo-yo Test) बरोबर डेक्सा टेस्टही (DEXA Test) महत्वाची केली आहे. या चाचण्यामुळे खेळाडू किती फिट हे लवकरच कळणार आहे. अशी स्थिती पाहता रोहितने देखील फिटनेस मनावर घेतली आहे. त्याने इंस्टाग्रावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो एक यादी दाखवताता, वजन उचलताना आणि नाचतानाही दिसत आहे. त्याचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
रोहितने शेवटचा सामना बांगलादेशमध्ये खेळला होता. त्या वनडे मालिकेत त्याच्या हाताला दुखापत झाली होती. तरीही त्याने अर्धशतक केले होते. तो दुखापतीतून बरा न झाल्याने कसोटी मालिकेला मुकला. आता तो श्रीलंकेविरुद्ध संघपुनरागमन करत आहे.
बीसीसीआयने नुकतेच 2023ची पहिले चर्चासत्र केले. त्यामध्ये बोर्डने खेळाडू यो-यो टेस्टमध्ये नापास झाला तर संघात जागा मिळणार नाही, हे स्पष्ट केले आहे. तसेच रोहितच्या फिटनेसवर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्याच्या वजनावरूनही चाहत्यांनी त्याच्यावर टीका केल्या आहेत. आता तो संघात परतण्यासाठी आतूर असून तो फिटनेससाठी चांगलीच मेहनत घेत आहे.
भारत विरुद्ध श्रीलंका वनडे मालिकेचे सामने 10, 12 आणि 15 जानेवारी दरम्यान खेळले जाणार आहेत. पहिला सामना गुवाहाटी येथे होणार आहे.
https://www.instagram.com/reel/CnErvwBDxr5/?utm_source=ig_web_copy_link
श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारताचा संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल, ईशान किशन, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, उमरान मलिक.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘या’ दिवशी जड्डू करणार टीम इंडियात कमबॅक! अश्विनने दिले संकेत
आनंदाची बातमी! रिषभ पंतच्या गुडघ्याची शस्त्रक्रिया यशस्वी, मुंबईत उपचार सुरू