Friday, February 3, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘या’ दिवशी जड्डू करणार टीम इंडियात कमबॅक! अश्विनने दिले संकेत

January 7, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Ravindra-jadeja-

Photo Courtesy : Twitter/BCCI


भारताचा दिग्गज अष्टपैलू रविंद्र जडेजा मागच्या मोठ्या काळापासून राष्ट्रीय संघातून बाहेर आहे. आशिया चषकावेळी झालेल्या दुखापतीनंतर तो अद्याप क्रिकेटच्या मैदानावर परतू शकलेला नाही. मात्र, त्याचा भारतीय संघातील सहकारी व अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याने तो कधी मैदानावर पुनरागमन करेल याबाबतचे संकेत दिले आहेत.

रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) आशिया चषक 2022 (Asia Cup 2022) मध्ये भारतीय संघासाठी खेळत होता. पण या स्पर्धेदरम्यान दुखापत झाल्यामुळे जडेजाने संघातून माघार घेतली. दुखापतीनंतर जडेजाची मोठी शस्त्रक्रिया झाली. या दुखापतीमुळे त्याला टी20 विश्वचषकात देखील सहभागी होता आले नाही. सध्या सुरू असलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या मालिकांमध्ये तो खेळणार अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, आणखी थोडा काळ विश्रांती करण्याची मागणी त्याने स्वतः बीसीसीआयकडे केल्याने त्याची निवड झाली नाही.

भारताचा आघाडीचा फिरकीपटू असलेल्या रविचंद्रन अश्विनने नुकतीच एक मुलाखत दिली. यामध्ये जडेजा कधी पुनरागमन करणार याबाबतचा छोटा संकेत त्याने दिला. अश्विन म्हणाला,

“माझे त्याच्यासोबत बोलणे झाले आहे. तो पूर्ण फिट असून, तुम्हाला लवकरच मैदानावर दिसेल. स्वतः मी त्याला मैदानावर पाहण्यासाठी इच्छुक आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी तो जोरदार तयारी करत असल्याचे त्याने सांगितले. फिटनेस आणि फलंदाजी कौशल्य यावरही त्याने मेहनत घेतली.”

अश्विनच्या या वक्तव्याचा आधार घेतल्यास समजता येईल की जडेजा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळताना दिसेल. जडेजाच्या अनुपस्थितीत अक्षर पटेल यानेदेखील भारतासाठी शानदार कामगिरी केली आहे. ‌ जडेजाने मागील वर्षी भारतीय संघासाठी खेळताना 5 कसोटीत 328 धावा व 10 बळी मिळवले होते. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत विजय मिळवून जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत जागा मिळवण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल.

(R Ashwin Hints About Ravindra Jadeja Comeback)

महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘हा तर गोलंदाजांचा अपमान’, रन-आऊट प्रकरणात अश्विनने घेतली ऍडम झम्पाची बाजू, डेविस हसीला सुनावले
श्रीलंकेचा दिग्गज कुमार संगकारा फिट, पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये केले गेले यशस्वी उपचार


Next Post
Rohit Sharma in Gym

यो-यो टेस्टच्या भीतीने कॅप्टन रोहितने बनवली लांबलचक यादी, मग जिमला बनवले डान्स फ्लोर

Chetan Sharma

BREAKING: टीम इंडियाला मिळाली नवी निवडसमिती! अध्यक्ष म्हणून चेतन शर्मांचीच फेरनिवड; चार नवे सदस्य सामील

KL Rahul

टी-20 मालिकेला मुकलेला राहुल वनडेसाठी सज्ज, उपकर्णधारपद गमावल्यानंतर नेट्समध्ये पठ्ठ्याचा कसून सराव

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143