पुणे: पुणे व्यापारी महासंघातर्फे आयोजित फेडरेशन प्रीमिअर लीग २०१९ या क्रिकेट स्पर्धेला मंगळवार, दिनांक १२ फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. मुकुंदनगर येथील कटारिया हायस्कूलच्या मैदानावर दिनांक १२ ते १७ फेब्रवारीदरम्यान ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेचे यंदा चौथे वर्ष असून मुख्य प्रायोजक सिस्का आणि सहप्रायोजक शॉ टोयोटा, गार्नेट बिल्डर्स अँड डेव्हलपर्स हे आहेत, अशी माहिती पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फतेचंद रांका आणि सचिव महेंद्र पितळीया यांनी दिली.
स्पर्धेत २० संघ सहभागी होणार आहेत. यामध्ये औंध स्टार्स (औंध व्यापारी संघटना), सीएपीडी लाईफसेव्हर्स (केमिस्ट असोसिएशन आॅफ पुणे डिस्ट्रीक्ट), सीएमडीए वर्डविझ (कॉम्प्युटर अॅन्ड मीडिया डिलर्स असोसिएशन), केमिकल रिअॅक्टर्स (पुणे केमिकल डिलर्स असोसिएशन), फॅशन फायटर्स ( पुणे जिल्हा होजिअरी, रेडीमेड, हॅन्डलूम डिलर्स असोसिएशन), पाडा वॉरियर्स (पूना आॅटोमोबाईल डिलर्स असोसिएशन), मशिनरी मास्टर्स (पूना मशिनरी असोसिएशन), मेपल प्लायमास्टर्स (पूना प्लायवूड डिलर्स असोसिएशन), पीसीएमए युनायटेड (पूना कॅम्प मर्चंटस् असोसिएशन), पीसीडब्ल्यूडिए नोव्हा (पुणे कार्पेट अॅन्ड वॉलपेपर डिलर्स असोसिशन) हे संघ सहभागी होत आहेत.
तसेच पुणे सराफ असोसिएशन (पीएसए इलेव्हन), स्टेनलेस स्टील स्मॅशर्स (पुणे स्टेनलेस स्टील मर्चंन्ट असोसिएशन), नीलकमल मार्मो स्ट्रायकर्स (पुणे टाईल्स अॅड मार्बल डिलर्स असोसिएशन), लक्ष्मीरोडस् कटारिया रॉयल्स (रिटेल टेक्स्टाइल गारमेंटस् सिंडीकेट), मेटल चॅलेंजर्स (दि ब्रास अॅन्ड कॉपर मर्चंट असोसिएशन), पीस्मा इलेव्हन (दि पुणे आयर्न अॅन्ड स्टील मर्चंटस् असोसिएशन), टिंबर स्ट्रायकर्स (दि पुणे टिंबर मर्चंटस् अॅन्ड सॉ मिल ओनर्स असोसिएशन), मेका-ट्रॉनिक पीसीपीडीए (दि पुणे कन्ज्युमर प्रोडक्ट डिस्ट्रीब्युटर असोसिएशन), नॉन फेरस इलेव्हन (दि पूना नॉन-फेरस डिलर्स असोसिएसन), पाईन पँथर्स (हार्डवेअर होलसेल डिलर्स असोसिएसन आॅफ पुणे) अशा एकूण वीस संघांचा स्पर्धेत सहभाग आहे.
स्पर्धेचे समन्वयक अभय व्होरा म्हणाले, स्पर्धेत पुरुष संघांचे ४७ डे-नाईट सामने होणार आहेत. स्पर्धा साखळी आणि बाद या स्वरूपात होईल. साखळी आणि उपांत्यपूर्व फेरीचे सामने १० षटकांचे, तर उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीचा सामना १२ षटकांचा होणार आहे. याशिवाय महिलांचे ६ संघ सहभागी होणार असून त्यांचे ६ सामने होणार आहेत. त्यामुळे संपूर्ण स्पर्धेत यंदा एकूण ५३ सामने होणार आहेत.
स्पर्धेचे उद्घाटन दि. १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० वाजता पुण्याचे पोलीस आयुक्त के.व्यंकटेशम यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी सिस्काचे राजेश उत्तमचंदानी, शॉ टोयोटाचे महेंद्र शॉ, गार्नेट बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे मनोज ओसवाल, युवराज ढमाले, कृष्णकुमार गोयल, योशा चे संजय बिहाणी, नरेश मित्तल, मनोज दर्डा उपस्थित राहणार आहेत. तर, समारोप दिनांंक १७ फेब्रवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता सिस्काचे राजेश उत्तमचंदानी यांच्या हस्ते होणार आहे. विजेत्या संघाला आकर्षक ट्रॉफी तसेच वैयक्तिक पारितोषिके देण्यात येणार आहेत. तसेच वैयक्तिक सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाºया खेळाडूंना स्पोर्ट्स सायकल, एलईडी टिव्ही, सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.
स्पर्धेचे आयोजन अभय व्होरा, बक्षीसिंग तलवार, ब्रिजेन शहा, निर्मल शहा, चंदन मुंदडा, संजय खोपडे, दीपक शहा, निलेश सोनिगरा, विजय राठोड, अभय गांधी, कल्पेश शहा, मनोज सारडा, विजय ओसवाल, अरविंद कोठारी, सुभाष पोरवाल, जयंत शेटे, मिठालाल जैन, सुनील मेहता, निलेश लुणावत, ओमप्रकाश मर्दा यांनी केले आहे.