---Advertisement---

रॉजर फेडररची १५व्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनच्या सेमीफायनमध्ये धडक

On: मंगळवार, जानेवारी 28, 2020 2:48 PM
---Advertisement---

मेलबर्न। आज(28 जानेवारी) ऑस्ट्रेलियन ओपन 2020मध्ये स्विझर्लँडचा टेनिस स्टार रॉजर फेडरर विरुद्ध अमेरिकेच्या टेनीस सँडग्रेनमध्ये उपांत्य पूर्व फेरीचा सामना रंगला. पाच सेटपर्यंत गेलेल्या या रोमांचकारी सामन्यात तिसऱ्या मानांकित फेडररने 6-3, 2-6, 2-6, 7-6(8), 6-3 अशा फरकाने विजय मिळवत 15 व्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.

3 तास 31 मिनिटे चाललेल्या या सामन्यात फेडररने तब्बल 7 मॅच पाँइंट वाचवले. या सामन्यात पहिला सेट फेडररने 6-3 असा सहज जिंकला होता. मात्र त्यानंतरच्या दोन्ही सेटमध्ये फेडरर संघर्ष करताना दिसला.

त्याने दुसऱ्या सेटमध्ये 15 अनफोर्स एरर केले. तर तिसऱ्या सेटमध्ये 0-3 असा पिछाडीवर असताना फेडररने मेडिकल टाईम आऊट घेतला. पण त्यानंतरही सँडग्रेनने या सेटमधील पकड कायम ठेवताना हा सेटही 6-2 असा जिंकत सामन्यात आघाडी घेतली.

चौथा सेट रोमांचकारी झाली. टायब्रेकमध्ये गेलेल्या या सेटमध्ये सँडग्रेनला तब्बल 7 मॅच पाँईट्स मिळाले होते. पण फेडररने त्याच्या अनुभवाच्या जोरावर कडवी लढत देत अखेर टायब्रेकर 10-8 असा जिंकत सेटही जिंकला आणि सामन्यात बरोबरी केली. पाचव्या सेटमध्ये फेडररने पूर्णपणे वर्चस्व ठेवताना हा सेट जिंकत सामनाही आपल्या नावावर केला.

या सामन्यानंतर 7 मॅच पाँईट्स वाचवल्याबद्दल फेडरर म्हणाला, ‘मी आज खरोखर भाग्यवान होतो.’

तसेच तो पुढे म्हणाला, ‘जसा जसा सामना पुढे जात होता. मला बरे वाटत होते. मी फक्त खेळण्याचा प्रयत्न करत होतो. माझा चमत्कारांवर विश्वास आहे.’

https://twitter.com/AustralianOpen/status/1222065283575287808

आता फेडररचा उपांत्य फेरीतील सामना नोव्हाक जोकोविच आणि मिलोस राओनिकमध्ये जो जिंकेल त्याच्याशी होणार आहे.

https://twitter.com/Maha_Sports/status/1222073313616257024

https://twitter.com/Maha_Sports/status/1220622745769103360

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---