---Advertisement---

‘आम्ही विचार करत होतो..’ विश्वविजेतेपदानंतर हरमनप्रीत कौरचा भावुक खुलासा! जाणून घ्या काय म्हणाली

On: सोमवार, नोव्हेंबर 3, 2025 7:56 PM
---Advertisement---

12 विश्वचषकांत इतर संघांना विजेता बनताना पाहण्याच्या वेदना हरमनप्रीत कौरच्या मनात होती. 2022 मध्ये स्वतःच्या कर्णधारपदाखाली ट्रॉफी जिंकता न आल्याची खंतही तिच्या मनात कायम होती. पण म्हणतात ना यश त्यांनाच मिळतं जे लढणं, झगडणं आणि कधीही हार मानणं जाणत नाहीत. 2 नोव्हेंबर 2025 ही तारीख हरमनप्रीतच्या करिअरमधील सर्वात अविस्मरणीय ठरली.

स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यांनंतर हरमनच्या कर्णधारपदावर अनेक प्रश्न निर्माण झाले होते. तिचा फॉर्म काही खास नव्हता. पण उपांत्य आणि अंतिम सामन्यानंतर सगळं चित्रच बदललं. हरमनप्रीत आता भारतीय महिला क्रिकेटला पहिल्यांदा विश्वविजेतेपद मिळवून देणारी कर्णधार ठरली आहे आणि विजय मिळाल्यानंतर तिचं भावनिक विधान समोर आलं आहे.

वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हरमन म्हणाली, मी स्मृती मंधानासोबत अनेक वर्ल्ड कप खेळले. जेव्हा जेव्हा आम्ही हरायचो, तेव्हा आम्ही खूप निराश होऊन घरी परतायचो आणि काही दिवस काहीच बोलायचो नाही. परत जेव्हा तयारीला लागायचो, तेव्हा फक्त एकच गोष्ट मनात असायची ‘आपल्याला सगळं पुन्हा नव्यानं सुरू करायचं आहे.

हे खूप मन हेलावणारं असायचं, कारण आम्ही अनेक वर्ल्ड कप खेळलो, फाइनल-सेमीफाइनलपर्यंत पोहोचलो, पण ट्रॉफी अगदी जवळ येऊनही मिळवू शकलो नाही. आम्ही नेहमी विचारायचो ‘हा दुष्काळ शेवटी कधी संपणार?’”

हरमन पुढे म्हणाली,आम्हाला वाटत होतं की, हा सामना आम्ही पहिल्याच चेंडूपासून जिंकू शकतो, कारण शेवटच्या तीन सामन्यांमध्ये आमचा आत्मविश्वास जबरदस्त वाढला होता. आम्हाला ठाऊक होतं की संघ म्हणून आपण काय करू शकतो. टॉस हरलो तरी काही फरक पडणार नव्हता. आम्हाला माहित होतं की बॅटिंगसाठी परिस्थिती अवघड आहे, पण स्मृती आणि शेफालीने सुरुवातीच्या 10 षटकांत अप्रतिम फलंदाजी केली आणि पाया भक्कम रचला.

हरमनने पुढे सांगितलं,
इंग्लंडकडून झालेल्या पराभवानंतर आमचं मनोबल पूर्णपणे खचलं होतं. तेव्हा आमचे कोच अमोल मजूमदार सर म्हणाले की, ‘आपण तीच चूक पुन्हा पुन्हा करू शकत नाही. आपल्याला त्या सीमारेषेच्या पलीकडे जायचं आहे.’ त्या दिवसानंतर सगळं काही बदललं.

आम्ही ‘व्हिज्युअलायझेशन’ आणि ‘मेडिटेशन’ सुरू केलं. सगळ्यांनी त्याकडे गांभीर्याने पाहिलं आणि खेळाचा आनंद घेऊ लागलो. त्या क्षणाने आम्हाला समजलं की आपण इथे काहीतरी कारणाने आलो आहोत आणि यावेळी आपण ते करून दाखवायचं आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---