---Advertisement---

विराट कोहलीला प्रपोज करणाऱ्या महिला क्रिकेटपटूनं केलं लग्न! सोशल मीडियावर पार्टनरसोबतचे फोटो केले शेअर

---Advertisement---

इंग्लंडची महिला क्रिकेटपटू डॅनियल व्याट हिनं एकेकाळी विराट कोहलीला प्रपोज केलं होतं. ती विराटची लग्न करू इच्छित होती. आता तिनं तिच्या गर्लफ्रेंडशी लग्न केलं आहे. डॅनियलनं नुकतेच तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले.

डॅनियल व्याटनं 2014 मध्ये सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती, ज्यात तिनं विराट कोहलीला प्रपोज केलं होतं. तिनं पोस्ट मध्ये लिहिलं होतं, “विराट कोहली माझ्याशी लग्न करशील का?” या पोस्टनंतर व्याट खूप चर्चेत आली होती. यानंतर तिनं म्हटलं होतं की ती गंमत करत होती. डॅनियल व्याट सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर सोबतच्या फोटोमुळेही चर्चेत आली होती. या दोघांचा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. हे दोघं एकमेकांचे चांगले मित्र आहेत.

डॅनियल व्याटनं इंस्टाग्रामवर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. तिनं ज्या मुलीशी लग्न केलं, तिचं नाव जॉर्जी हॉज आहे. ती एका फुटबॉल टीमची मॅनेजर आहे. या दोघींचा गेल्या वर्षी साखरपुडा झाला होता. आता त्यांचं लग्न झालं आहे. लग्नाच्या फोटोमध्ये दोघींनी पांढऱ्या रंगाचा गाऊन घातलेला दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Georgie Hodge (@georgiehodge)

 

डॅनियल व्याट हिनं इंग्लंडसाठी 2 कसोटी सामने खेळले, ज्यात तिनं 129 धावा केल्या आहेत. तिच्या बॅटमधून एक अर्धशतकही निघालं आहे. याशिवाय तिनं इंग्लंडसाठी 110 एकदिवसीय सामन्यांमध्ये 1907 धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये तिच्या नावे 2 शतकं आणि 5 अर्धशतकं आहेत. टी20 बद्दल बोलायचं झालं तर, तिनं 156 सामन्यांमध्ये 2726 धावा ठोकल्या आहेत. टी20 मध्ये तिच्या नावे 2 शतकं आणि 14 अर्धशतकं आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

“तुला लाज वाटली पाहिजे”, पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूनं शिख धर्माची खिल्ली उडवल्यानंतर हरभजन सिंग भडकला
टी20 विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेनं केला अद्भूत पराक्रम, टीम इंडियाचा विक्रम मोडून रचला इतिहास
गॅरी कर्स्टन यांनी सांगितलं पाकिस्तानच्या पराभवाचं कारण; म्हणाले, आम्ही 15 ओव्हरपर्यंत मॅचमध्ये होतो, मात्र त्यानंतर…

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---