---Advertisement---

FIFA WC 2022: पोर्तुगलच्या पराभवानंतर एकच गोंधळ, रोनाल्डोला बाकावर बसवणाऱ्या हेड कोचला दिला नारळ

On: शुक्रवार, डिसेंबर 16, 2022 5:10 PM
Fernando Santos & Cristiano Ronaldo
---Advertisement---

कतार येथे सुरू असलेल्या फिफा विश्वचषक (FIFA World Cup) 2022चा अंतिम टप्पा जवळच आला आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (18 डिसेंबर) अर्जेंटिना आणि फ्रांस यांच्यात लुसेल स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या स्पर्धेत अनेक सामन्यांमध्ये उलटफेर दिसले. त्यातील एकच सामना ज्यामध्ये मोरोक्कोने पोर्तुगलला पराभूत करत उपांत्य फेरी गाठली आणि पोर्तुगल स्पर्धेबाहेर झाला. याच सामन्यात स्टार खेळाडू क्रिस्तियानो रोनाल्डो याला बाकावर बसवले गेले. ज्यामुळे चाहत्यांनी प्रश्नांचा भडिमार केला आणि मुख्य प्रशिक्षक पदाच्या राजीनाम्याची मागणी केली. जी गुरूवारी (15 डिसेंबर) पूर्ण झाली.

फर्नांडो सॅंटोस (Fernando Santos) यांनी पोर्तुगलच्या मुख्य प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिला. पोर्तुगलने त्यांच्या ट्वीटर अकाउंटवरून याची माहिती दिली. 68 वर्षीय सॅंटोस यांनी 2014पासून पोर्तुगलच्या प्रशिक्षक पदाची जबाबदारी स्विकारली.

मोरोक्कोकडून 1-0 असा पराभव झाल्याने चाहते खूपच निराश झाले होते. तसेच सॅंटोस हे प्रशिक्षकपदाचा राजीनामा देण्यास तयार नव्हते. त्यांनी विश्वचषकात रोनाल्डोला बाकावर बसवून चूक केली हे मान्य केली. पदाचा त्याग केल्यानंतर सॅंटोस म्हणाले, “माझ्या निर्णयामुळे कोणीही खूष नव्हते, पण तुम्हाला वेळप्रसंगी कठीण निर्णय घ्यावेच लागतात. पोर्तुगलचे मुख्य प्रशिक्षक पद भुषविणे स्वप्नसारखे होते आणि ते पूर्ण झाल्याने आनंद होत आहे. ”

सॅंटोस यांनी 8 वर्षांच्या कार्यकाळात 109 सामन्यांमध्ये पोर्तुगलचे प्रशिक्षकपद भुषविले. ज्यामध्ये संघाने 226 गोल केले आणि 67 सामने जिंकले. यादरम्यान संघाने 2 चषकही जिंकले. त्यामुळे ते पोर्तुगलच्या इतिहासात आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकणारे पहिलेच प्रशिक्षक ठरले. त्यांच्या प्रशिक्षकादरम्यान संघाने 2016मध्ये युरो चषक आणि 2019मध्ये युईएफए नेशन लीग जिंकली.

कतारचा विश्वचषक रोनाल्डोच्या कारकिर्दीचा शेवटचा विश्वचषक मानला जात होता. त्यातच अतिमहत्वाच्या सामन्यात त्याला बाकावर बसवल्याने चाहतेही नाराज झाले होते. तो एक निर्णय चुकल्याने सॅंटोस यांच्यावर टीका झाली. आता त्यांनी राजीनामा दिल्याने मुख्य प्रशिक्षक पद रिक्त झाले आहेत. त्यावर कोणाची निवड होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
तब्बल 1 हजारहून अधिक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर ‘या’ खेळाडूंच्या बॅटमधून निघाले शतक, यादीत दोन भारतीय
नाचता येईना अंगण वाकडे! पाकिस्तानी दिग्गजाची मोठी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘मला इंग्रजी भाषेची जाम चीड…’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---