मुंबई । फिरोजशाह कोटला येथे असलेले जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे (डीडीसीए) कार्यालय बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका कर्मचार्याला कोरोना संसर्ग झाल्याचे आढळले आहे, त्यानंतर युनियनने इतर सर्वांच्या आरोग्याची काळजी डोळ्यांसमोर ठेवून हे पाऊल उचलले आहे.
अध्यक्ष व सचिवांच्या अनुपस्थितीत सध्या डीडीसीएचे सहसचिव राजन मनचंदा हे पदभार स्वीकारत आहेत. पुढील आदेश येईपर्यंत कोटला बंद ठेवण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. कारण जास्तीत जास्त लोकांना क्वारंटाइनमध्ये ठेवणे आवश्यक असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच संपर्कातील लोकांचा शोध घेतला जात आहेत.
“डीडीसीएमध्ये कोव्हिड- १९ पॉझिटिव्ह असलेला एक रुग्ण आढळला आहे. पुढील आदेश येईपर्यंत कार्यालय त्वरित बंद केले असून संपूर्ण कार्यालय आवारात स्वच्छतादेखील लवकरात लवकर व्यवस्थित करावी,” असेही राजन मनचंदा यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या-
-कसोटीत त्रिशतक ठोकलेला खेळाडू म्हणतो, आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली तरच मला…
-आयपीएल २०२० बाबत विराट कोहली म्हणतो, मला २०१६ सारखं…
-त्याला फटकेबाजी करताना रोखणे केवळ अशक्य, आम्हाला प्लॅनच बदलावा लागणार
ट्रेंडिंग लेख-
-जर तेव्हा टी-२० क्रिकेट असते तर, हे ५ दिग्गज खेळाडू ठरले असते हिरो
-आयपीएलमधील असे ५ मोठे विक्रम जे मोडणे आहे अशक्य
-एकहाती सामना बदलायची ताकद ठेवणारा प्रत्येक संघाचा दमदार परदेशी खेळाडू