भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघ विश्वचषक 2023 स्पर्धेतील 5व्या सामन्यात आमने-सामने आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून सलामीला डेविड वॉर्नर आणि मिचेल मार्श उतरले होते. मात्र, मार्श शून्यावर लवकर बाद झाला. असे असले, तरीही डेविड वॉर्नर याने सामन्यात 9 धावा करताच विश्वचषकातील खास विक्रम आपल्या नावावर केला.
वॉर्नरचा विक्रम
झाले असे की, डेविड वॉर्नर (David Warner) याने डावातील 7वे षटक टाकत असलेल्या हार्दिक पंड्या याच्या दुसऱ्या चेंडूवर खणखणीत चौकार मारला. यासह वॉर्नरच्या 12 चेंडूत 9 धावा पूर्ण झाल्या आणि विश्वचषकात खेळताना त्याने आपल्या 1000 धावाही पूर्ण केल्या. अशाप्रकारे वॉर्नर विश्वचषकात सर्वात कमी डावात सर्वात वेगवान 1000 धावा करणारा फलंदाज ठरला. त्याने सचिन तेंडुलकर, एबी डिविलियर्स आणि विवियन रिचर्स यांसारख्या दिग्गजांचाही विक्रम मोडीत काढला.
वॉर्नरला वनडे विश्वचषकात 1000 धावा करण्यासाठी फक्त 19 डाव खेळावे लागले. वॉर्नरपूर्वी हा विक्रम संयुक्तरीत्या सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि एबी डिविलियर्स (AB De Villiers) यांच्या नावावर होता. या दोघांनीही विश्वचषकात 20 डावात वेगवान 1000 धावा केल्या होत्या. तसेच, विवियन रिचर्ड्स आणि सौरव गांगुली यांनी 21 डाव खेळताना विश्वचषकात वेगवान 1000 धावा करण्याचा पराक्रम गाजवला होता.
Fastest to 1000 ODI World Cup runs (by innings)
19 – DAVID WARNER🇦🇺
20 – Sachin Tendulkar🇮🇳
20 – AB de Villiers🇿🇦
21 – Viv Richards🏝️
21 – Sourav Ganguly🇮🇳#INDvAUS #CWC2023 pic.twitter.com/iCwZSmSZyi— Kausthub Gudipati (@kaustats) October 8, 2023
वनडे विश्वचषकात वेगवान 1000 धावा करणारे फलंदाज (डावांनुसार)
19 – डेविड वॉर्नर*
20 – सचिन तेंडुलकर
20 – एबी डिविलियर्स
21 – विवियन रिचर्ड्स
21 – सौरव गांगुली
वॉर्नरची विश्वचषकातील कामगिरी
यापूर्वी वॉर्नर याने विश्वचषकात एकूण 18 सामने खेळले होते. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 992 धावा निघाल्या होत्या. यामध्ये 4 शतकांचा समावेश होता. 178 ही त्याची विश्वचषकातील सर्वोच्च धावसंख्या राहिली आहे. ही धावसंख्या त्याने 2015च्या विश्वचषकात केली होती. तसेच, वॉर्नर 2019च्या विश्वचषकात 647 धावांसह सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानी होता.
हेही वाचा-
IND vs AUSच्या वर्ल्डकप अभियानाला सुरुवात! टॉस जिंकत ऑस्ट्रेलिया करणार बॅटिंग, पाहा तगडी प्लेइंग XI
क्रिकेटप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी! भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी BCCIने उचललं मोठं पाऊल, घेतला ‘हा’ निर्णय