Loading...

रोहितचा नादच खुळा! सचिन, पाँटिंग सारख्या दिग्गज खेळाडूंना ठरला भारी…

बंगळुरु। भारताने रविवारी(19 जानेवारी) एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या तिसऱ्या आणि निर्णायक वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाला 7 विकेट्सने पराभूत केले. भारताच्या या विजयात सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने शतकी खेळी करत महत्त्वाचे योगदान दिले.

रोहितने या सामन्यात 8 चौकार आणि 6 षटकारांसह 128 चेंडूत 119 धावांची खेळी केली. हे त्याचे वनडे कारकिर्दीतील 29 वे शतक आहे. त्याने 217 व्या वनडे डावात खेळताना हे 29 वे शतक केले आहे.

त्यामुळे तो जलद 29 वे वनडे शतक करणारा दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज ठरला आहे. त्याने या यादीत सचिन तेंडुलकर आणि रिकी पाँटिंग या दिग्गजांना मागे टाकले आहे.

सचिनने 265 व्या वनडे डावात खेळताना 29 वे शतक केले होते. तर पाँटिंगने 330व्या वनडे डावात 29 वे शतक केले होते. वनडेत सर्वात जलद 29 वे शतक करण्याचा विश्वविक्रम सध्या भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या नावावर आहे. कोहलीने 185 व्या डावात 29 वे वनडे शतक केले होते.

विशेष म्हणजे वनडेत 29 किंवा त्यापेक्षा अधिक शतके केवळ सचिन, पाँटिंग, कोहली आणि रोहित या चार फलंदाजांनाच करता आली आहेत.

Loading...

#सर्वात जलद 29 वे वनडे शतक करणारे फलंदाज – 

185 डाव – विराट कोहली

217 डाव – रोहित शर्मा

265 डाव – सचिन तेंडुलकर

Loading...

330 डाव – रिकी पाँटिंग

#वनडेमध्ये सर्वाधिक शतके करणारे फलंदाज – 

49 शतके – सचिन तेंडुलकर (463 सामने)

43 शतके – विराट कोहली (245 सामने)

Loading...

30 शतके – रिकी पाँटिंग (375 सामने)

29 शतके – रोहित शर्मा (224 सामने)

28 शतके – सनथ जयसुर्या (445 सामने)

Loading...
You might also like
Loading...