---Advertisement---

मयंक अगरवालने मोडला महान फलंदाज डॉन ब्रॅडमन यांचा तब्बल ८९ वर्षीय जूना विक्रम

On: शुक्रवार, नोव्हेंबर 15, 2019 4:57 PM
---Advertisement---

इंदोर। भारत विरुद्ध बांगलादेश(India vs Bangladesh) संघात होळकर क्रिकेट स्टेडियमवर पहिला कसोटी सामना(1st Test) सुरु आहे. आज या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताचा सलामीवीर फलंदाज मयंक अगरवालने(Mayank Agarwal)द्विशतकी खेळी केली आहे.

त्याने 303 चेंडूत त्याचे कारकिर्दीतील दुसरे द्विशतक पूर्ण केले. त्याने भारताकडून पहिल्या डावात खेळताना 330 चेंडूत 243 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 28 चौकार आणि 8 षटकार मारले. विशेष म्हणजे त्याने कसोटी कारकिर्दीतील केवळ 12 व्या डावात खेळताना दुसरे द्विशतक केले आहे.

त्यामुळे तो कसोटीत सर्वात जलद पहिली दोन द्विशतके करणारा दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज ठरला आहे. त्याने हा पराक्रम करताना महान क्रिकेटपटू डॉन ब्रॅडमन(Don Bradman) यांना मागे टाकले आहे. ब्रॅडमन यांनी कसोटी कारकिर्दीतील 13 व्या डावात दुसरे द्विशतक केले होते.

कसोटीत सर्वात जलद पहिली दोन द्विशतके करण्याचा(Fewest innings to two 200s) विश्वविक्रम भारताचा माजी फलंदाज विनोद कांबळीच्या(Vinod Kambli) नावावर आहे. कांबळीने 5 व्या डावात त्याच्या कारकिर्दीतील दुसरे द्विशतक केले होते.

मयंकने हे द्विशतक करताना बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात सुरुवातीला चेतेश्वर पुजाराबरोबर दुसऱ्या विकेटसाठी 91 धावांची भागीदारीही केली. त्यानंतर त्याने अजिंक्य रहाणेला साथीला घेत चौथ्या विकेटसाठी 190 धावांची भागीदारी केली.

तसेच रहाणे 86 धावांवर बाद झाल्यानंतर मयंक आणि रविंद्र जडेजाने 5 व्या विकेटसाठी 123 धावांची भागीदारी करत भारताला 400 धावांचा टप्पा पार करुन दिला आहे. 89

कसोटीत सर्वात जलद पहिली दोन द्विशतके करणारे फलंदाज-

5 डाव – विनोद कांबळी

12 डाव – मयंक अगरवाल

13 डाव – डॉन ब्रॅडमन

14 डाव – लॉरेन्स रोव

15 डाव – ग्रॅमी स्मिथ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---