ऑस्ट्रेलियामध्ये नुकत्याच झालेल्या टी20 विश्वचषकात भारतीय संघाला उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला होता. यानंतर भारतीय खेळाडूंना आयपीएल व्यतिरिक्त इतर देशांच्या टी20 लीगमध्ये खेळण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी होतेय. त्याचवेळी फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल क्रिकेटर्स असोसिएशन (FICA) च्या अहवालातून एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. या अहवालानुसार, बहुतेक खेळाडूंना त्यांच्या स्वतःच्या देशाव्यतिरिक्त इतर टी20 लीगमध्ये खेळायचे आहे. ज्यामुळे त्यांना आर्थिकरित्या सक्षम होता येईल.
एका क्रिकेट संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, फिका या क्रिकेटपटूंच्या संघटनेने आपला एक अहवाल सादर केला. यामध्ये जगभरातील बहुतांशी क्रिकेटपटूंचा कल हा विविध टी20 लीग खेळण्याकडे असल्याचे दिसून येत आहे. सध्या जगातील तब्बल 40 टक्के खेळाडू टी20 लीग खेळण्यासाठी आपल्या राष्ट्रीय संघासह करारात नाहीत. तर, 42 टक्के खेळाडू कमीत कमी एक लीग खेळत असतात. फिकाने 11 देशांच्या 400 पेक्षा जास्त खेळाडूंचा हा सर्वे केला होता. यामध्ये भारत व पाकिस्तानच्या खेळाडूंचा समावेश नाही.
या अहवालात असे नमूद करण्यात आले आहे की, अफगाणिस्तानचे राशिद खान, मोहम्मद नबी व मुजीब रहमान हे एका वर्षात तब्बल सात वेगवेगळ्या लीगमध्ये खेळतात.
जगभरातील इतर सर्व क्रिकेट बोर्डांनी आपल्या खेळाडूंना टी20 लीग खेळण्याची परवानगी दिली असली तरी, बीसीसीआय आपल्या खेळाडूंना आयपीएलव्यतिरिक्त कोठेही खेळू देत नाही. मागील काही काळापासून जगभरातील अनेक क्रिकेटपटूंनी आपल्या देशापेक्षा टी20 लीग खेळण्यास प्राधान्य दिले आहे. वेस्ट इंडिजचे तर जवळपास सर्वच क्रिकेटपटू विविध लीग खेळताना दिसतात. न्यूझीलंडच्याही ट्रेंट बोल्ट, मार्टिन गप्टिल व जिमी निशाम यांनी देखील असाच निर्णय घेतला आहे. तर, काही खेळाडूंनी टी20 लीग खेळण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती देखील घेतलीये.
(FICA Reports Cricketer Want Play T20 Leagues Ahead International Cricket)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारत 41 वर्षांपूर्वीचा ‘हा’ नकोसा विक्रम पुन्हा करणार? गावसकरांपैक्षा धवनकडून जास्त अपेक्षा!
‘या’ गोलंदाजासोबत खेळण्याचा मला फायदाच, अर्शदीप सिंगने सांगितले चकित करणारे नाव