---Advertisement---

IND vs ENG: ‘फिल्डिंगमध्येही महान संघ झळकतात’ ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियावर साधला निशाणा!

On: शनिवार, जून 28, 2025 8:58 PM
---Advertisement---

भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) दोन्ही संघात लीड्समध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने (team india) खूप खराब पद्धतीने क्षेत्ररक्षण केले. भारतीय संघाने या कसोटी सामन्यात 6 झेल सोडले. यामध्ये एकट्या यशस्वी जयस्वालनेच (Yashsvi Jaiswal) 4 झेल सोडले. इंडियाच्या खराब क्षेत्ररक्षणावर ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज यष्टीरक्षक फलंदाज ब्रैड हैडिन यांनी टीम इंडियाच्या फील्डिंग विषयी टीम इंडियावर निशाणावर साधला आहे.

ऑस्ट्रेलियाचे माजी यष्टिरक्षक फलंदाज ब्रैड हैडिन यांचं म्हणणं आहे की, शुबमन गिलच्या (Shubman Gill) नेतृत्वातील टीम इंडियाला (Team India) इंग्लंड विरुद्ध 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेत खराब फील्डिंगच्या अडचणीतून सुधारण्यासाठी त्यांच्या खेळामध्ये बदल करण्याची गरज आहे. भारतीय क्षेत्ररक्षकांना खास करून यशस्वी जयस्वालने पहिल्या कसोटी सामन्यात खूप झेल सोडले. लीड्समध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात इंग्लंडने भारताचा 5 विकेट्सने पराभव केला.

ऑस्ट्रेलियासाठी 66 कसोटी सामने खेळलेल्या ब्रैड हैडिन यांनी म्हटले, प्रत्येक काळात प्रत्येक महान संघ फील्डिंगमध्ये शानदार राहिलेला आहे. गिलला सुद्धा या संघामध्ये या गोष्टीची सुरुवात करावी लागेल. यासाठी त्यांचा खेळामध्ये थोडा बदल करण्याची गरज आहे. जर तुम्हाला चांगली फिल्डिंग करायची असेल आणि प्रत्येक वेळी प्रतिस्पर्ध्यासारखे राहायचे असेल तर हे करावेच लागेल.

हैडिन यांनी म्हटले की, आयपीएलमध्ये देखील झेल चांगल्या पद्धतीने पकडले गेले नाहीत. तिथेही खूपदा सुटले. आम्ही प्रतिभाशाली गोलंदाजांबद्दल आणि फलंदाजांबद्दल भाष्य केले. पण नेमकी अडचण ही झेल पकडण्याची होती. मी इतके नक्की म्हणेल की, सर्वश्रेष्ठ फील्डिंग संघ बनण्याचा उपाय तुम्हाला शोधावा लागेल. कारण तुमच्याकडे कौशल्याची कमी नाही.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---