रशिया। रशियात सुरू असलेला फिफा विश्वचषक आता शेवटच्या टप्प्यात आला आहे. 21वे पर्व असणाऱ्या या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतील संघाची नावे स्पष्ट झाली आहेत.
त्यातील पहिला उपांत्यपूर्व फेरीचा सामना 6 जुलैला उरूग्वे विरुद्ध फ्रान्स असा होणार आहे. हा सामना नीझवी नोवगोरोड स्टेडियमवर खेळला जाणार असून याला सांयकाळी 7.30ला सुरूवात होणार आहे.
8 वेळा आमने-सामने येऊन फ्रान्स एकदाच विजयी
याआधी हे दोन्ही संघ 8 वेळा आमने-सामने आले असून फ्रान्सला एकदाच यामध्ये विजय मिळवीता आला. जून 2013ला हे दोघे शेवटी एकमेकांच्या विरोधात खेळले होते. यात उरूग्वेने फ्रान्सला 1-0 असे पराभूत केले होते.
विश्वचषकातही उरूग्वेच अपराजित राहिला असून 1966ला झालेला पहिला सामना त्यांनी 2-1 असा जिंकला होता. तर 2002 आणि 2010ला झालेले सामने अनिर्णीत राहिले. या तीन सामन्यात एकूण 3 गोल झाले. ज्यातील उरूग्वेने 2 तर फ्रान्सने 1 गोल केला.
उपांत्यपूर्व फेरीत पोहचण्याआधी हे दोन्ही संघ अपराजित राहिले आहेत. या दोन्ही संघानी साखळी फेरीतील तीनही सामने जिंकले आहेत.
बाद फेरीतील सामन्यात उरूग्वेने पोर्तुगलला 2-1 असे पराभूत केले होते. हे दोनीही गोल कवानीने केले होते.
60 वर्षांनंतर फ्रान्सकडून सर्वाधिक गोल करणाऱ्यामध्ये एमबाप्पे दुसराच खेळाडू
तर 30 जूनला झालेल्या बाद फेरीच्या सामन्यात फ्रान्सने बलाढ्य अर्जेंटीनाला 4-3 अशी सहज मात दिली. या सामन्यातील 2 गोल एकट्या कायलिन एमबाप्पेने केले होते ते ही 4 मिनीटांच्या फरकाने.
19 वर्षीय माबाप्पाने 4 सामन्यात 3 गोल केले आहे. फ्रान्सकडून सर्वाधिक गोल करणाऱ्यामध्ये तो जस्ट फॉनटेन नंतरचा दुसराच खेळाडू आहे. फॉनटेनने 60 वर्षांपूर्वी 1958 स्वीडनमधील विश्वचषकात 13 गोल केले होते.
उरूग्वेसाठी लुईस सुवारेज या स्पर्धेत 2 गोल केले आहेत.
फ्रान्सचे एंटोनी ग्रिजमान आणि लुकास हर्नांडेझ तसेच उरूग्वेचे दिएगो गोदिन आणि जोस गमेनेझ हे चारही खेळाडू अॅटलेटिको माद्रीद क्लबकडून एकत्र खेळतात.
तर दुसरीकडे उरूग्वे आणि फ्रान्सचे स्ट्रायकर्स एडिसन कवानी आणि कायलीन एमबाप्पे हे दोघेही पॅरीस सेंट जर्मेन या फुटबॉल क्लबकडून एकत्र खेळतात.
उरूग्वेला नवीन विक्रम करण्याची संधी
फिफाच्या रिपोर्टनूसार, उरूग्वेचा संघ 4-4-2 या फॉर्मेशनने खेळणार असून त्यांच्याकडे एक विक्रम करण्याचीही संधी आहे. जर त्यांनी हा सामना जिंकला तर ते एकाच स्पर्धेत सलग 5 सामने जिंकून रशियात एक चांगला विक्रम करू शकतील.
असा पराक्रम करण्याची ही त्यांची पहिलीच वेळ आहे. याआधी उरूग्वेने असा विक्रम 1950 आणि 1954 यामध्ये मिळून केला होता. दोनदा फिफा विश्वचषक जिंकणारा उरूग्वे सहा वेळा शेवटच्या आठ मध्ये राहिला आहे.
दक्षिण अमेरिके विरूद्ध खेळताना फ्रान्स त्यांच्या शेवटच्या विश्वचषकातील 9 सामन्यात अपराजित राहिला आहे.
उरूग्वेचे प्रशिक्षक म्हणून ऑस्कर तबरेज यांचा हा 186वा सामना आहे. त्यांच्या मते, कवानीला या सामन्याची सुरूवात करण्याची संधी आहे मात्र तो जखमी असल्याने त्याच्या जागी क्रिस्टीयन स्टुअनी हा लुईस सुवारेजच्या जोडीने खेळू शकतो.
फ्रान्सचे प्रशिक्षक डिडिएर डेसचम्पस् यांचा हा 81वा सामना असणार आहे. 2002ला झालेला उरूग्वे विरूद्धचा मैत्रीपूर्व सामना हा प्रशिक्षक जबाबदारी खालील त्यांचा पहिलाच सामना होता. हा सामना अनिर्णीत राहीला होता.
डेसचम्पस् यांनी खेळाडूंना सांगितले आहे की, कवानी या सामन्यात खेळेल की नाही याने फरक न पडता आपण कसे खेळणार याकडे अधिक लक्ष द्या.
तसेच फिफा क्रमवारीत फ्रान्स 7व्या तर उरूग्वे 14व्या क्रमांकावर आहेत.
संभावित संघ
उरूग्वे- फर्नांडो मुस्लेरिया, मार्टिन केरेस, दिएगो गोदिन, जोस गमेनेझ, एडिसन कवानी/ क्रिस्टीयन स्टुअनी, लुईस सुवारेज, दिएगो लक्ष्लत, नहितिथ नांदेझ, लुकास तोरेरीरा, मतियास व्हिसिनो, रॉड्रिगो बेंटान्चूर
फ्रान्स- ह्यूगो ललोरीस, बेंजामिन पॅवार्ड, सॅम्युअल उमटिती, राफेल वराने, लुकास हर्नांडेझएनगोलो कॅंटे, पॉल पोग्बा, कोरेंटिन टॉलिसो, कायलिन एमबाप्पे, एंटोनी ग्रिजमान, ऑलिव्हर गिरहोद
महत्त्वाच्या बातम्या-
–मेस्सी-रोनाल्डो वाद पुन्हा पेटला; दापंत्याने घेतला घटस्फोट
–फिफा विश्वचषकातील अचूक निकाल सांगणाऱ्या ऑक्टोपसचे केले तुकडे