---Advertisement---

भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या टी२० सामन्याबद्दल सर्वकाही…

On: शुक्रवार, जुलै 6, 2018 8:48 AM
---Advertisement---

कार्डीफ। आज६ जुलैला भारत विरुद्ध इंग्लंड संघात दुसरा टी२० सामना होणार आहे. या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघाला विजयी आघाडी घेण्याची संधी आहे.

भारताने मँचेस्टर येथे झालेल्या पहिल्या टी२० सामन्यात ८ विकेट्सने विजय मिळवून ३ सामन्यांच्या टी२० मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली आहे. त्यामुळे ही आघाडी कायम राखण्याचे  भारताला आव्हान असणार आहे.

पहिल्या सामन्यात केएल राहुल आणि कुलदिप यादव यांनी भारताच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली होती. तर इंग्लंडकडून जॉस बटलरने अर्धशतक केले होते.

भारताने मागील काही महिन्यांपासुन मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. मागील १५ टी२० सामन्यांमध्ये भारताने १३ विजय मिळवले असुन त्यात सलग ७ विजय आहेत.

मात्र इंग्लंडही आजच्या सामन्यातून पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल. त्यांनी नुकतेच आॅस्ट्रेलिया विरुद्ध ५ वनडे आणि १ टी २० जिंकून आॅस्ट्रेलियाला व्हाइटवॉश दिला आहे

इंग्लंड आणि भारत यांच्यात याआधी १२ टी२० सामने झाले आहेत. त्यातील ६ सामन्यात भारताने तर ६ सामन्यात इंग्लंडने बाजी मारली आहे. तसेच भारताने इंग्लंडमध्ये ४ टी२० सामने खेळले असुन त्यातील एकच सामन्यात विजय मिळवण्यात भारताला यश आले आहे.

त्यामुळे भारत पहिल्यांदाच इंग्लंडमध्ये टी२० मालिका जिंकण्यासाठी उत्सुक असेल.

इंग्लंड विरुद्ध भारत कधी होणार आहे दुसरा टी२० सामना?

इंग्लंड विरुद्ध भारत दुसरा टी२० सामना ६ जुलै २०१८ ला होणार आहे.

कोठे होईल इंग्लंड विरुद्ध भारत दुसरा टी२० सामना?

इंग्लंड विरुद्ध भारत दुसरा टी२० सामना कार्डीफ येथील सोफिया गार्डनवर होणार आहे.

किती वाजता सुरु होईल इंग्लंड विरुद्ध भारत दुसरा टी२० सामना?

भारतीय प्रमाणवेळे नुसार रात्री १० वाजता इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातीस दुसऱ्या टी२० सामन्याला सुरुवात होईल.

इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील दुसरा टी२० सामना कोणत्या चॅनेलवर पाहता येईल?

सोनी सिक्स आणि सोनी सिक्स एचडी या चॅनेल्सवरुन प्रेक्षकांना इंग्लंड विरुद्ध भारत दुसरा टी२० सामना पाहता येणार आहे.

इंग्लंड विरुद्ध भारत दुसरा टी२० ऑनलाइन कसा पाहता येईल?

sonyliv.com या वेबसाईटवर इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील दुसरा टी२० सामना ऑनलाइन पाहता येईल.

यातून निवडला जाईल ११ जणांचा संघ:

भारत: विराट कोहली(कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, केएल राहुल, सुरेश रैना, मनीष पांडे, एमएस धोनी,हर्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, सिद्धार्थ कौल, उमेश यादव.

इंग्लंड: इयान मॉर्गन (कर्णधार), मोईन अली, जॉनी बेअरस्टो, जेक बॉल, जॉस बटलर, सॅम करन, अॅलेक्स हेल्सक्रिस जॉर्डन,लिआम प्लंकेटआदिल रशीदजो रूटजेसन रॉयडेव्हिड विली आणि डेविड मलान.

महत्त्वाच्या बातम्या:

-असा काय विक्रम गोलंदाजीत झालायं ज्याची जगभरात आहे चर्चा!

-विशेष मुलाखत- शिव छत्रपती पुरस्कार मिळाला की कबड्डी कारकीर्दीचं सार्थक झालं असं समजेन- गिरीश इरनक

-विंबल्डनचे चाहते आहात? मग या १० गोष्टी माहित असायलाच हव्यात..  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment